कलाविश्वात वावर नसला तरी सौंदर्याच्या बाबतीत अमृता खानविलकरलाही टक्कर देते तिची आई

कलाविश्वात वावर नसला तरी सौंदर्याच्या बाबतीत अमृता खानविलकरलाही टक्कर देते तिची आई

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत की, ज्यांच्या आई या त्यांच्यापेक्षा देखील सुंदर दिसत असतात. अनेक अभिनेत्री त्यांच्या आईसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतात. बॉलिवूडमध्ये आपण असेच चित्र गेल्या काही वर्षात पाहिले असेल. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या आईसोबत कायमच फिरत असते.

शिल्पा शेट्टी ही देखील आपल्या आईबद्दल अनेकदा माहिती देत असते. मराठीमध्ये देखील हे चित्र आता गेल्या काही वर्षापासून पाहायला मिळत आहे. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने तिच्या सोबत डान्स केल्याचे पाहायला मिळाले आणि त्याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि शेअर देखील केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी चित्रपट सृष्टीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले आहे. हिंदीमधील तिचे अनेक चित्रपट हे हिट ठरले आहेत. यामध्ये राजी, सत्यमेव जयते, मलंग अशा सारख्या चित्रपटांमध्ये तिने जबरदस्त असे काम केले आहे. छोट्या पडद्यावरही तिने आपली ओळख निर्माण केली आहे.

खतरो के खिलाडी, डान्स इंडिया डान्स, सुर नवा ध्यास नवा अशा अनेक शोमध्ये ती सूत्रसंचालन करत असते. या शोमध्ये तिच्या सुत्रसंचलनाने वेगळीच एक बहार येते. अलीकडेच अमृता खानविलकर हिचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने सात आठवड्यामध्ये चांगली कमाई केली आहे.

या चित्रपटात तिने चंद्राची भूमिका साकारून सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. चंद्रा हे गाणं प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील आणि दीपाली विचारे यांनी साकारले आहे. चंद्रमुखी चित्रपटाची काही दिवसापूर्वीच सक्सेस पार्टी पार पडली. या पार्टीमध्ये अनेकांनी धमाल केली. मात्र, या पार्टीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

अमृतासोबत तिची आईदेखील यामध्ये दिसली आहे. आईसोबत ती धमाल असा डान्स करताना दिसत आहे. अमृताच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केली आणि लाईक देखील केलेले आहे. अमृता खानविलकर दिसायला सुंदर आहे. अमृता खानविलकर हिच्या आईचे नाव समजू शकले नाही. मात्र, या दोघांमध्ये खूप चांगले बाँडिंग आहे असे कळते.

Team Hou De Viral