मराठमोळी अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ ने दिली गोड बातमी !

मराठमोळी अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ ने दिली गोड बातमी !

अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) ही अभिनेत्री सध्या मराठी चित्रपट सृष्टीसह बॉलीवूडमध्ये देखील चर्चेत आहे. कारण अमृता खानविलकर हिच्याकडे मराठीसह बॉलीवूड मधून देखील अनेक ऑफर असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच अमृता खानविलकर हिचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटांमध्ये तिने चंद्रा या लावणीवर अतिशय भन्नाट नृत्य केले. या चित्रपटाचे प्रमोशन देखील खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेष्ठ अभिनेता प्रसाद ओक यांनी केले आहे. त्यामुळे या चित्रपटाला एक वेगळीच पसंती प्रेक्षकांची मिळाली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता खानविलकर हिने मेट्रो रेल्वे स्टेशन चित्रपटगृह रुग्णालयामध्ये जाऊन देखील प्रमोशन केले होते.

त्यामुळे या चित्रपटातील चंद्रा हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते. या गाण्यावर देखील अनेकांनी ठेका धरला होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये काम करणाऱ्या मायरा वायकुळ या छोट्या मुलीने देखील या गाण्यावर ठेका धरून चाहत्यांचे मने जिंकली होती, तर अमृता खानविलकर हिने काही वर्षांपूर्वी लग्न केले असून तिचा पती हा सध्या दिल्लीत राहतो, तर ती मुंबईला राहते.

दोघेही कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. काही वर्षांपूर्वी अमृता खानविलकर हिने हिमांशू मल्होत्रा सोबत लग्न केले आहे. हिमांशू हा देखील एक अभिनेता व दिग्दर्शक देखील आहे. आता अमृता खानविलकरच्या बाबतीतली एक बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

यामध्ये अमृता खानविलकर ही चांगलीच भडकली असल्याचे सांगण्यात येत आहे सहजासहजी अमृता खानविलकर ही कोणावरही भडकत नाही. मात्र, एका चाहत्याने असा प्रश्न केला की, त्यावर अमृता ही चांगलीच भडकल्याचे सांगण्यात येते. अमृता ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

मात्र, काही दिवसापूर्वी चाहत्यांनी असा तिला प्रश्न केला की त्यानंतर तिचा पारा चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. चंद्रमुखी या चित्रपटादरम्यान अमृता खानविलकर हिला वजन वाढवण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी तब्बल आठ किलो वजन वाढवले होते. मग या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आणि इथेच माशी शिंकली.

अमृता खानविलकर हिने वजन वाढवल्याने तिचे पोट हे थोडे मोठे दिसायला लागले होते. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिला असा प्रश्न विचारला की, तू गरोदर आहेस का? त्यावर अमृता खानविलकर ही चांगलीच भडकली होती. यावर अमृता हिने चाहत्यांना उत्तर देऊन सांगितले होते की, आमच्या घरी आम्ही सगळेच बारीक चनीचे आहोत.

चंद्रा भूमिकेसाठी मी आठ किलो वजन वाढवलं होतं. त्याची तयारी सुरू केली, तेव्हा आईने धाकट्या बहिणीच्या बाळांतपणात जो आहार दिला, तो मला सुरू केला. माझे वजन वाढवल्यानंतर माझे फोटो पाहून लोकांनी ‘काय मग लॉकडाऊन मध्ये गुड न्यूज आहे, असं वाटतं, अशी अफवा पसरली होती. हे मेसेज यायला लागले.

अखेर नाव जाहीर न करता मी एका सिनेमाची तयारी करते हे, सांगितले होते. मात्र नंतर मी याबाबत खुलासा करून सांगितले की मी गरोदर नाही. त्यानंतर या चर्चा थांबल्या होत्या.

Team Hou De Viral