‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मध्ये या प्रसिद्ध ‘खलनायिकेची’ एन्ट्री

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मध्ये या प्रसिद्ध ‘खलनायिकेची’ एन्ट्री

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका अनेकांनी पाहिले असेल. या मालिकेचे दोन भाग प्रसारित झालेले आहेत कोरोना महामारीमुळे ही मालिका नंतर बंद करण्यात आली होती. मात्र, या मालिकेतील कलाकारांची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. या मालिकेमध्ये शेवंता आणि नाईक यांची प्रेम कहानी देखील प्रचंड गाजली होती.

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा पहिला भाग प्रचंड लोकप्रिय झाला होता. या मालिकेतील सगळेच कलाकार जबरदस्त असे काम करत होते. शेवंता, पांडू, नाईक यासारखे पात्र प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत. या मालिकेत काम करणारी शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने गेल्या वर्षीच्या सुमारास साताऱ्यामध्ये एक दुकान देखील सुरू केले होते.

कोरोना महामारीमुळे आपल्याला हाताला काहीतरी काम पाहिजे म्हणून तिने हे दुकान सुरू केल्याची चर्चा रंगली होती. सातारामध्ये तिने ब्रँडेड साड्यांचे दुकान सुरू केले आहे. आता या साड्यांच्या दुकानाला देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील कळत आहे. अपूर्वा नेमळेकर ही हरहुन्नरी अभिनेत्री असून अभिनयामध्ये तिचा हात कोणीही पकडू शकत नाही, असे देखील काही जण खासगीत सांगत असतात.

अपूर्वा नेमळेकर हिने अनेक छोट्या-मोठ्या भूमिकामधून आपली चुणूक दाखवून दिली आहे. मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख रात्रीस खेळ चाले या मालिकेतून मिळाली. अपूर्वा ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

तिच्या फोटोला चहाते देखील मनातून प्रतिसाद देत असतात. मध्यंतरी तिने एक बोल्ड आणि ब्यूटिफुल असे फोटो शूट केले होते. तिच्या फोटोची देखील खूपच चर्चा रंगली होती. अपूर्वा नेमळेकर ही गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टी मध्ये सक्रीय झाली आहे. अपूर्वाने चित्रपटात येण्यापूर्वी अनेक छोट्यामोठ्या जाहिरातींमधून देखील काम केल्याचे समोर आले आहे.

त्याचप्रमाणे तिने नाटकात देखील आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले होते. त्यानंतर तिला छोट्या पडद्यावर एंट्री मिळाली. आता अपूर्वा नेमळेकर हिच्याकडे चांगले काम असल्याचे देखील बोलले जाते. अपूर्वा नेमळेकर ही आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये लवकरच दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबतचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये अपूर्वा ही दिसत आहे. अपूर्वा हिला महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये पाहायला आपल्याला आवडेल ते आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral