चित्रपट सृष्टीला धक्का ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची ‘विषप्राशन’ करून आत्महत्या

चित्रपट सृष्टीला धक्का ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची ‘विषप्राशन’ करून आत्महत्या

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसापासून धक्क्यावर धक्के बसत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण की एका मागून एक अनेक अभिनेते हे आपले जीवन संपवत आहेत. अलीकडच्या काळामध्ये आत्महत्येचे प्रमाण हे खूप वाढले आहे.

याचा आता शोध घेण्याची गरज असल्याचे देखील अनेक जण म्हणत आहेत. चमचमत्या दुनियेमध्ये नैराश्य हे ठासून भरलेले आहे. बॉलिवूड अभिनेता किंवा दक्षिणेत अभिनेता यांना नेमक काय हवे असते, काय नको असते याबद्दल कोणीही चर्चा करत नाही. त्यामुळे असे अभिनेते आणि अभिनेत्री हे नैराश्याच्या गर्केत जातात आणि आपल्या आयुष्यासोबत नको ते करून बसतात.

त्यामुळे अशा कलाकारांबाबत समुपदेशन करावे, अशी मागणी देखील गेल्या काही दिवसापासून अनेकदा होताना दिसत आहे, तर याबद्दल अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आता देखील दक्षिणेतील चित्रपट सृष्टीमधील एका आघाडीच्या अभिनेत्यांनी आपले जीवन संपवले आहे. यामागचे खरे कारण काही कळू शकले नाही.

मल्याळम अभिनेता शरत चंद्रन हा त्याच्या घरी मृता अवस्थेत आढळला. त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर खरी माहिती समोर येईल, असे देखील आता सांगण्यात येत आहे. शरत हा 37 वर्षाचा होता. त्याने अनेक चित्रपटात काम केले. मात्र, विशेष करून त्याचे अंगमली डायरीज यासारख्या चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या आहेत.

तसेच त्याने अनेक जाहिरातीमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या जाहिरातीला देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या पाठीमागे आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. शरतच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट देखील सापडली असून माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असे त्याने म्हटले आहे.

तरी देखील आता पोलीस सर्व बाबींचा तपास करत आहेत. केरळच्या कक्कड येथील राहत्या घरी त्याचा मृतदेह सापडला आहे. घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. शरतने लिहिलेल्या सुसाईड नोट नुसार तो नैराश्यामध्ये होता. त्यामधूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलीस सांगत आहेत, तर दुसरीकडे त्याचे कुठे प्रेम प्रकरण होते का? याचाही पोलीस तपास करत आहेत.

Team Hou De Viral