ही कामे केल्यानंतर आपण करत असाल आंघोळ, तर व्हा सावध, ही सवय ठरू शकते धोकादायक

ही कामे केल्यानंतर आपण करत असाल आंघोळ, तर व्हा सावध, ही सवय ठरू शकते धोकादायक

सध्या गरम वातावरणामुळे दिवसांतून 2 ते 3 वेळा आंघोळ करायला सर्वांनाच आवडते. एरवीही आंघोळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असतोच. मात्र याच्याही विशिष्ट वेळा असतात. अवेळी किंवा काही विशिष्ट कामे केल्यानंतर आंघोळ केल्याने आपल्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी उद्भवू शकते. त्यामुळे अशावेळी आंघोळ करणे कटाक्षाने टाळा. जाणून घ्या या वेळा.

बाहेरून आल्यावर आंघोळ करणे टाळा – अनेकदा भरपूर चालून किंवा प्रवास करून आल्यावर आपल्याला आंघोळ करावीशी वाटते, पण असे करू नका. घरी आल्यावर अर्ध्या तासाच्या अंतराने आंघोळ करा. बाहेरून आल्या आल्या आपल्या शरीरातील उष्णता वाढलेली असते आणि शरीरावर जर तात्काळ पाणी पडले तर शरीराचे तापमान वेगाने बदलते. तसेच व्यायाम किंवा नृत्य केल्यानंतरही शरीराचे तापमान वाढलेले असते. त्यामुळे कितीही वाटले तरी यानंतर लगेच आंघोळ करू नका. यामुळे सर्दी, डोकेदुखी, खोकला होऊ शकतो.

जेवणानंतर लगेचच करू नका आंघोळ – जेवण झाल्या झाल्या लगेच आंघोळ करणे शक्यतो टाळा. जेवणाआधी आंघोळ करा किंवा जेवणानंतर दोन तासांच्या अंतराने आंघोळ करा. जेवल्यानंतर शरीर अन्न पचवण्याची प्रक्रिया करत असते ज्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. आणि यावेळी आंघोळ केल्यामुळे शरीरातले तापमान वेगाने खाली येते. शरीराचा अंतर्गत भाग गरम राहतो आणि बाह्यभाग मात्र पाणी पडल्याने थंड होतो ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. यामुळे ताप किंवा डोकेदुखी होऊ शकते. याच कारणामुळे चहा किंवा कॉफीसारखी गरम पेये प्यायल्यानंतरही तासाभराच्या अंतराने आंघोळ करावी.

झोपून उठल्यावर लगेचच आंघोळ करणे ठरू शकते अपायकारक – आपल्यापैकी अनेकांना झोपेतून उठल्या उठल्या लगेच शॉवर घेण्याची सवय असते, मात्र ही सवय घातक ठरू शकते. झोपेत असताना शरीराचे तापमान आणि शरीरातला रक्ताचा दबाव वाढलेला असतो. लगेचच आंघोळ केल्यासही तापमान वेगाने कमी होते ज्यामुळे आपल्याला रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे उठल्यानंतर किमान अर्ध्या तासाने आंघोळ करावी.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral