… म्हणून अंत्यविधीनंतर मागे वळून पाहिले जात नाही

… म्हणून अंत्यविधीनंतर मागे वळून पाहिले जात नाही

जन्म- मृत्यू हे माणसाच्या हातात नसतो. जन्म कधी घ्यावा आणि मृत्यू कधी व्हावा हे ईश्वराच्या आणि निसर्गाच्या हातात असतं. मात्र, माणसाचा जन्म म्हणजे माणसाचे आयुष्य हे एखाद्या भाड्याच्या घरासारखे असते या घरातून त्या घरात राहायला जाण्यासारखे. मात्र, जसे धर्म तसेच समज देखील आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत.

एखाद्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार केल्यानंतर स्मशानभूमी इथून मागे वळून पाहू नये, असा फार पूर्वीपासून नियम आपला समाज पाळत आलेला आहे. हिंदू धर्मात तर याबाबत वेगवेगळे नियम लावण्यात आलेली आहेत. हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार देण्यात आलेले आहेत. सोळा संस्कारांतील सगळ्यात शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार होय.

मात्र, मृत्यू हे नाव ऐकल्यानंतर भल्या भल्यांची गाळण उडते. अनेक जण मित्राच्या अंत्यविधीला जात असतात. मात्र स्वतःचा मृत्यू याबाबत बोलताना ती खूप घाबरतात. कारण कुणालाही मृत्यूमुखी पडणे हे अजिबात आवडत नाही. मृत्यूनंतर काय होते हे कोणीही आज सांगू शकत नाही. मात्र, हिंदू धर्माचा मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याला पुन्हा जन्म मिळत असतो, अशी मान्यता आहे.

गीतेमध्ये श्रीकृष्णाने याबाबत सांगितलेले आहे. जन्मानंतर मृत्यू अटळ आहे आणि मृत्यूनंतर जन्मही होणारच आहे. मात्र, हिंदूच्या एका ग्रंथमध्ये म्हणजेच गरूडपूरान यामध्ये अंत्यसंस्कार याबाबत खूप विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. माणसाचे शरीर हे पाच वायूंनी भरलेले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश त्यामुळे माणसाचे शरीर हे यातच मिळणार आहे.

त्यामुळे तुम्ही कोट्यावधी रुपये मिळवत असाल तरी तुम्हाला एक दिवस मृत्यू हे अंतिम सत्य स्वीकारावेच लागेल. आपण लष्करात जर काम करत असाल तर तेथे त्यांचे मन हे एवढे घट्ट केले जाते की त्यांना मृत्यूचे भय हे अजिबात वाटत नाही. त्यामुळे हे सत्य देखील आपण स्वीकारले पाहिजे. कारण मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर काय होते, हे आपल्याला कळणार नाही.

त्यामुळे याला घाबरून जगले तर आपले आयुष्य हे अतिशय भयानक होऊन जाईल. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग आपण आनंदाने करावा. आयुष्यात कटकट करून काहीही फायदा नाही. त्यामुळे येणारा क्षण हे अतिशय उत्साहाने जगलात तरच आपल्याला चांगले आयुष्य जगता येईल. माणसाच्या मृत्यूनंतर त्याला स्मशानभूमीत नेण्यात येते.

त्यांचा अंतिम संस्कार होतो. त्यानंतर गरुड पुराण मध्ये सांगितल्याप्रमाणे एखाद्या मृताला अग्नी दिल्यानंतर परत मागे वळून पाहून नाही, याचे कारण देखील विस्तृतपणे गरुड पुराण मध्ये दिलेले आहे. याचे कारण म्हणजे जर आपण अंत्यसंस्कार केल्यानंतर ज्या व्यक्तीला अग्निडाग दिला आहे, त्या व्यक्तीच्या आत्म्याला असे वाटू शकते की, माझ्यामध्ये या लोकांचा अजूनही जीव गुंतलेला आहे.

आणि तो आत्मा तुमच्या अवतीभवती घुटमळत राहू शकतो. त्यामुळे मागे वळून आपण जर नाही पाहिले तर त्या आत्म्याला असे वाटते की, आता आपले यांच्यासोबत काही देणेघेणे नाही आणि आत्मा परलोकमध्ये जातो. त्यानंतर तो दुसऱ्या कुठल्यातरी शरीरात प्रवेश करतो. जर आपण मागे वळून पाहिलं तर तो आत्मा आपल्या आसपास घुटमळत राहतो आणि त्यांना असे वाटते की, माझ्यावर अजूनही हे लोक खूप प्रेम करतात.

त्यामुळे तो आपल्या घरातच घुटमळत राहतो. आत्महत्या, हत्या किंवा अपघातामध्ये निधन झालेल्या व्यक्तीचा आत्मा हा घुटमळत राहू शकतो. कारण की ते अपघात झालेले असतात. त्यामुळे त्याच्या अतृप्त इच्छा या तशाच राहतात आणि तो घुटमळू शकतो. मात्र, एखाद्या व्यक्तीने पुण्यकर्म केले असल्यास त्याला दुसरा जन्म मिळू शकतो.

Team Hou De Viral