या लोकप्रिय अभिनेत्रीची मुलगी झळकते ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत..

या लोकप्रिय अभिनेत्रीची मुलगी झळकते ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत..

मालिका विश्वामध्ये सध्या अनेक बालकलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसत आहेत. मग त्या हिंदी मालिका असो का मराठी मालिका असो. या बाल कलाकारांच्या भूमिका या प्रेक्षकांना पाहायला फार आवडतात. आता देखील एक बालकलाकार प्रेक्षकांना फारच आवडत आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपल्याला लक्ष्मीची भूमिका दिसत आहे.

लक्ष्मीची भूमिका बालकलाकार साईशा साळवी साकारत आहे. त्याचबरोबर या मालिकेमध्ये आपल्याला अनन्या ही भूमिका देखील दिसत आहे. या दोन गोंडस मुली या मालिकेमध्ये चांगल्या प्रकारे काम करताना दिसत आहेत. अनेकांना असा प्रश्न पडतो की, या बाल कलाकारांना सर्व अभिनय कोण शिकवतो, त्यांना कुठली ट्रेनिंग दिले जाते का? असा प्रश्न देखील अनेकांना पडतो.

तर अनेक बालकलाकार यांना घरातूनच अभिनयाचा धडा मिळत असतो. आता अनन्या हिला देखील घरातूनच अभिनयाचा धडा मिळाला आहे. तिची आई देखील अभिनेत्री आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सहा वर्षाच्या लीपनंतर आता गौरी आणि जयदीप यांची मुलगी लक्ष्मी हिची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे मालिकेला वेगळे वळण मिळत आहे, तर या मालिकेमध्ये गौरीची मैत्रीण अनन्या ही देखील दाखवण्यात आली आहे.

अनन्या ही देखील अतिशय लोकप्रिय अशी बालकलाकार आहे. तिने काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. एकूणच तिची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. विशेष म्हणजे अनन्या हिची आई देखील अभिनेत्री आहे. अनन्याची भूमिका श्रावणी पनवेलकर ही साकारत आहे. श्रावणी ही अतिशय जबरदस्त अशी बालकलाकार आहे. तिने अनेक मालिकात आणि काही चित्रपटातही काम केल्याचे सांगण्यात येते.

श्रावणी हिची आई देखील अभिनेत्री असून तिचे नाव अंकिता जोशी पनवेलकर असे त्यांचे नाव असून त्या सध्या “पिंकीचा विजय असो” या मालिकेमध्ये आपल्याला काम करताना दिसत आहेत. त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. शुभमंगल ऑनलाईन, बाळूमामाच्या नावानं चांगभलं आशा मालिकांमध्ये देखील आपल्याला अंकिता या दिसल्या आहेत.

तर अंकिता आणि श्रावणी यांची जोडी आपल्याला आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral