सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे लवकरच करणार लग्न? ‘त्या’ व्हायरल फोटोंमुळं चर्चेला उधाण,जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे लवकरच करणार लग्न? ‘त्या’ व्हायरल फोटोंमुळं चर्चेला उधाण,जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर काही व्हायरल झालेल्या फोटोंवरून ती लवकरच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाहबंधनात अडकरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सोशल मीडियावर अंकिताचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अंकिताच्या हाताला मेहंदी काढलेली दिसत आहे. लग्नाच्या मेहंदी सोहळ्यात एखाद्या नवरीचा लुक असावा तसाच लुक अंकिताचा दिसत आहे. त्यामुळं अंकिता गुपचूप लग्न उरकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत.

अंकितानं तिच्या अकाऊंटवर हे फोटो शेअर केले नसले तरी, तिची बहिणी अशितानं हे फोटो शेअर केले आहेत. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला. अंकितानं काही महिन्यांपूर्वीच विकीसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता.

दोघांचा साखरपुडा देखील झाला असल्याच्या चर्चा आहेत. सुशांतच्या निधनानंतर विकीवर देखील नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यामुळं त्यानं सोशल मीडियावरंच कमेंट सेक्शन बंद केलं होतं. तसंच गेल्या काही दिवसांपासून अंकिता आणि विकी जैन यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चा केवळ अफवा असल्याचं तिनं एका मुलाखतीतल म्हटलं आहे.

मी विकीला डेट करतेय, आणि त्याच्यासोबत खूष आहे, असंही अंकितानं स्पष्ट केलं आहे. सुशांत आणि अंकिता जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. सुशांतच्या निधनानंतर अंकिता पुन्हा चर्चेत आली आहे. तिनं सुशांतच्या मृ त्यूचं खरं कारण समोर यावं यालाठी प्रयत्न केले.

पंरतु तिच्यावर टीका होऊ लागली. कारण नसतानाही अंकिता सुशांतच्या निधनाचं दु:ख व्यक्त करतेय, त्याची विधवा असल्याचं भासवतेय, असा आरोपही तिच्यावर केला गेला होता. त्यानंतर अंकितानं तिचे आनंदी आणि एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral