सुशांतच्या निधनानंतर एक महिन्याने आज पहिल्यांदा अंकिता लोखंडेने केली भावनिक पोस्ट..

सुशांतच्या निधनानंतर एक महिन्याने आज पहिल्यांदा अंकिता लोखंडेने केली भावनिक पोस्ट..

आज अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ त्म-ह त्येला एक महिना पूर्ण झाला. मात्र या एक महिन्यात सुशांतचे चाहते त्याच्या आठवणीतून जराही बाहेर आलेले नाहीत. सुशांतच्या आ त्म ह त्येचं कारण एक महिना झाला तरी अद्यापही कळू शकलेलं नाही.

नुकतंच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सुशांतच्या निधनानंतर एक महिन्याने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पासून सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही ती खंबीर राहावी यासाठी प्रार्थना केली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या देवघरात दिवा लावला आहे. त्याच्यासोबत पांढरी फुलं देखील दिसून येत आहेत.

अंकिताने अगदी कमी शब्दात ही पोस्ट केली आहे ज्यामधून अंकिताचे चाहते तिचं दुःख प्रतिक्रियांद्वारे व्यक्त करत आहेत. अंकिताने लिहिलं आहे ‘चाईल्ड ऑफ गॉड.’ सुशांतच्या आ त्म ह त्येनंतर अंकिता पूर्णपणे कोसळली होती. ती बोलण्याची मनस्थितीत नसल्याचं तिच्या जवळच्या मित्र-मैत्रीणींनी सांगितलं होतं.

आज जवळपास सुशांत गेल्यानंतर थेट एक महिन्याने तिने सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. सुशांतच्या आठवणीत तिने ही पोस्ट केली आहे. अंकिताच्या या पोस्टवर अनेकांनी यावर कमेंट करुन तिला मजबुत राहण्याचा सल्ला दिला आहे. या पोस्टवर कमेंट करुन तिला प्रत्येकजण हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तिचं दुःख सगळेजण समजू शकतात. ती खंबीर राहावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

एका युजरने लिहिलं आहे की, अंकिता आजही त्याला मिस करतेय. पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं.अंकिता नेहमी तिच्या सोशल मिडियावर ऍक्टीव्ह असायची. काही ना काही पोस्ट करत ती चाहत्यांसोबत संपर्कात असायची. मात्र सुशांतच्या निधनानंतर अंकिताला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून ती अजुनही सावरलेली नाही. तीने त्या एक महिन्यात एकही पोस्ट केली नाही.

अंकिताने इंस्टाग्रामवर तिची शेवटची पोस्ट सुशांतच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ जूनला केली होती. हा एक टिकटॉक व्हिडिओ होता. ज्यात ती तिच्या अंदाज दाखवत होती. सुशांतच्या जाण्याने अंकिता अजुनही त्याच धक्क्यात आहे. सुशांतच्या कुटुंबियांना भेटायला आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हायला ती त्याच्या पटना येथील घरी देखील गेली होती.

इतर बातम्यांसाठी आत्ताच पेज लाईक करा.

Team Hou De Viral