सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने आता उचलले हे पाऊल, हे अंकिताला माहितीय का?

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने आता उचलले हे पाऊल, हे अंकिताला माहितीय का?

बॉलिवू़ड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आता वीस दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील त्याचे चाहते अद्याप या धक्क्यातून बाहेर पडलेले नाहीत. सुशांतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यात आता तिच्या बॉयफ्रेंडने धक्कादायक निर्णय घेतला आहे.

खरेतर सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कित्येक लोक अंकिता व विकीला सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल करत आहे. विकीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कमेंट बॉक्स मध्ये जाऊन काही लोकांनी सुशांतच्या निधनासाठी त्याला जबाबदार ठरवले आहे आणि हे सगळे विकीला पाहावले नाही तर त्याने हे पाऊल उचलले आहे.

त्याने स्टारकिड्सप्रमाणे इंस्टाग्राम अकाउंट कमेंट सेक्शन लिमिटेड केले आहे. विकीचे जुने पोस्ट पाहिले तर लक्षात येईल की सुशांतच्या निधनानंतर त्याच्या पोस्टवर युजर्सने त्याला खूप ट्रोल केले आहे.

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता विकी जैनसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ते दोघे लवकर लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून या नात्याबद्दल जाहिर केले होते. सुशांत व अंकिताची जोडी चाहत्यांना खूप आवडायची.

अशात सोशल मीडियावर अंकिताचा बॉयफ्रेंड विकी जैनने कोणतीही पोस्ट टाकली की युजर्स त्याला ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत.अंकिता लोखंडे व सुशांत सिंग राजपूत यांनी पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केले होते. अंकिता व सुशांत यांनी सहा वर्षे एकमेकांना डेट केले होते.त्यावेळी ते लग्न देखील करणार होते. मात्र अचानक ते दोघे वेगळे झाले.

इतर बातम्या –

आणि जेव्हा प्रियंका चोप्रामुळे की अक्षयच्या संसारात आला होता भूकंप, ट्विंकल सेट वर जाऊन केले होते असे काही…

रणवीर सिंग त्याच्या ‘आईला’ त्याचा हा चित्रपट अजिबात दाखवू इच्छित नव्हता, चित्रपट पाहिल्यानंतर आईने केले असे काही …

Team Hou De Viral