सुशांतच्या मृ त्यूच्या दोन आठवड्यानंतर अंकिता लोखंडेला सतत विचारले जातात आहेत हे पाच प्रश्न !

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत जाऊन दोन आठवडे झालेत. त्याच्या मृ त्यूचे दु:ख अद्यापही चाहते पचवू शकलेले नाहीत. सुशांतने नै राश्यापोटी आ त्म ह त्या केल्याचे मानले जातेय. पण अनेकांच्या मते, तो बॉलिवूडच्या घराणेशाहीचा बळी ठरला. त्यामुळे सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात संताप पाहायला मिळतोय.
करण जोहर, आलिया भट, रिया चक्रवर्ती, महेश भट, सलमान खान, एकता कपूर असे अनेकजण नेटक-यांच्या निशाण्यावर आले आहेत. सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे ही सुद्धा यातून सुटलेली नाही. खरे तर बॉलिवूडमधील घराणेशाही आणि अंकिताचा काहीही संबंध नाही. पण अंकिता सुशांतच्या पूर्वायुष्याचा एक भाग होती. या कारणाने सुशांतचे चाहते अंकितावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत.
पहिला प्रश्न – तू सुशांतच्या अंत्य संस्काराला का गेली नाहीस?
सुशांत व अंकिता जवळपास 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अर्थात काही वर्षांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. मात्र याऊपरही काहींच्या मते, अंकिताने सुशांतच्या अंत्य दर्शनाला जायला हवे होते. पण अंकिता सुशांतच्या अंत्य संस्काराला हजर नव्हती. त्यामुळे असे का? असा सवाल नेटकरी करत आहेत.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिताच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सांगितल्यानुसार, अंकिताला सुशांतचे अंत्य दर्शन घेण्याची इच्छा होती. मात्र तिला यासाठी मनाई करण्यात आली. कारण अंकिता खूप हळवी आहे. अशा गोष्टी ती सहन करू शकली नसती.
दुसरा प्रश्न- ती पोस्ट का शेअर केली?
सुशांतच्या निधनापूर्वी काही तास आधी अंकिताने तिच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘देव, काही लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतो कारण देवाने त्या गोष्टी ऐकल्या असतात, ज्या त्या लोकांनी ऐकलेल्या नसतात,’ अशी ती पोस्ट होती. सुशांतच्या आ त्म ह त्ये नंतर काहीच क्षणात अंकिताने ही पोस्ट डिलीट केली होती.अंकिताने ही पोस्ट का केली होती आणि लगेच डिलीट का केली, असा सवाल आता सुशांतचे चाहते विचारत आहेत.
तिसरा प्रश्न- सुशांतसोबत ब्रेक अप का केले
सुशांत व अंकिताचे ब्रेक अप झाले नसते, तर आज सुशांत जिवंत असता, अशी भावना काहींनी व्यक्त केली आहे. 2016 मध्ये सुशांत व अंकिताचे ब्रेक अप झाले होते. पण या ब्रेक अपचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. या ब्रेक अपनंतर अंकिता डिप्रे शन मध्येही गेली होती.
चौथा प्रश्न- तुला सुशांतने फोन केला होता?
मृत्यूपूर्वी सुशांतने तुला फोन केला होता का? असा प्रश्नही अंकिताच्या कमेंटबॉक्समध्ये अनेकांनी विचारला आहे. सुशांतने मृ त्यूपूर्वी त्याची सध्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती व मित्र महेश शेट्टीला अखेरचा कॉल केला होता, असे पोलिस चौकशीतून समोर आले आहे. दोघांनीही सुशांतचा फोन उचलला नव्हता.
पाचवा प्रश्न- काय तू स्वत:ला कधी माफ करू शकशील?
सुशांतने आ त्म ह त्या केली, यासाठी काहीजण अंकितालाही जबाबदार ठरवत आहेत. सुशांतपासून विभक्त झाल्यावर खरे तर अंकिता त्याच्याबद्दल वाईट असे काहीही बोलली नव्हती. तरीही काही लोक सुशांतच्या आ त्म ह त्ये नंतर अंकिताला ट्रोल करत आहेत.
इतर बातम्यासाठी आमचे पेज लाईक करा.