ज्याची सगळ्यांना भीती होती ते घडलंच… आई झाल्यानंतर ‘Anushka Sharma’ चा मोठा निर्णय

ज्याची सगळ्यांना भीती होती ते घडलंच… आई झाल्यानंतर ‘Anushka Sharma’ चा मोठा निर्णय

अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून गणाली जाते. अनुष्का शर्माने आजवर अनेक चित्रपटात काम केलेले आहे. अतिशय देखणे रूप आणि आपल्या अभिनयामुळे तिने बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. अनुष्का हिने आजवर अनेक चित्रपटात काम केले. तिने काम केलेले सगळे चित्रपट हिट राहिलेले आहेत.

अनुष्का शर्माने विराट कोहली ( Virat Kohli ) याच्या बरोबर लग्न केले आहे. 2017 मध्ये या दोघांचे धुमधडाक्यात लग्न झाले. त्या आधी अनुष्का शर्माचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. यामध्ये विशेष करून रणवीर सिंह याच्यासोबत अनुष्का हिचे अफेअर असल्याची चर्चा देखील त्या वेळेस मोठ्या प्रमाणात होती आणि या दोघांनी चित्रपटात देखील अतिशय बोल्ड सीन दिले होते.

त्यामुळे देखील तिचे आणि रणवीरचे अफेअर सुरू असून हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा होती. अनुष्का हिचा जन्म 1988 रोजी झाला असून ती ३३ वर्षाची आहे. ती मूळ आयोध्याची राहणारी आहे. सगळ्यात आधी तिने मॉडेलिंगमध्ये आपले करियर केले. मॉडेलिंग मधून नंतर ती बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला आली आणि तिला पहिल्या झटक्यात यशराज बॅनरचा चित्रपट मिळाला.

हा तिचा सर्वाधिक हिट चित्रपट ठरला असे म्हटले तर वावगे ठरू नये.
शाहरुख खान सोबत तिला तिला रब ने बना दी जोडी या चित्रपटात 2008 मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि हा तिचा बंपर हिट राहिला. त्यानंतर 2010 मध्ये आलेला बँड बाजा बारात हा चित्रपटही लोकप्रिय राहिला. जब तक है जान या चित्रपटातही तिने शाहरुख खान सोबत काम केले होते.

त्यानंतर एक दील धडकणे दो, ये दिल हे मुश्किल, सुई धागा, सुलतान, पिके, संजू यासारख्या चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यानंतर तिने विराट कोहली सोबत लग्न केले. आता या दोघांना एक मुलगी देखील आहेत. आता अनुष्का शर्मा हिने आई झाल्यानंतर एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

अनेकांना असे वाटले की, तिने बॉलीवूड सोडले की काय. मात्र असे काही झाले नसून अनुष्का शर्मा हिने क्लीन प्लेट फिल्म आता सोडले आहे. सुरुवातीला हे प्रोडक्शन हाऊस अनुष्का शर्मा सांभाळत होती. मात्र, आता आल्यानंतर तिने एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, मी आता या प्रोडक्शन हाऊस मधून माघार घेत असून माझा भाऊ हे सगळं काही पाहणार आहे.

तसेच तिने आपला भावाला या साठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या प्रॉडक्शन हाऊस या माध्यमातून आतापर्यंत जे काम केले त्याचा मला खूप अभिमान आहे. मात्र, आता आई झाल्यामुळे मला अनेक गोष्टींचा समतोल साधावा लागतो. त्यावेळेस आपण हा निर्णय घेऊन प्रॉडक्शन हाउस सोडले आहे, असे तिने सोशल मीडियावर सांगितले आहे.

Team Hou De Viral