धक्कादायक ! चावडीवर अपूर्वाने केला मांजरेकरांचा अपमान, मांजरेकर अपूर्वाच्या उद्धटपणावर संतापले

धक्कादायक ! चावडीवर अपूर्वाने केला मांजरेकरांचा अपमान, मांजरेकर अपूर्वाच्या उद्धटपणावर संतापले

बिग बॉसच्या घरामध्ये अपूर्वा नेमळेकर ही अशी स्पर्धक आहे जी महेश मांजरेकर यांनाही सुद्धा उलट बोलते. चावडी वर ती मांजरेकरांचा सुद्धा अपमान करते. आता तर तीच्यामुळे मांजरेकरांची होणारी चिडचिड बघून मांजरेकर स्वतःच बिग बॉस सोडून जातात की काय असं वाटायला लागले आहे, असे चाहते म्हणताना दिसत आहेत.

खरंतर आतापर्यंत बिग बॉस मराठीचे तीन सीजन झाले. पण अपूर्वा नेमळेकर सारखे उद्घाट स्पर्धक अजूनही एकदाही बघितले नाहीत. म्हणजेच या बाईने एक-दोन सिरीयल मध्ये काम केलं म्हणून कोणाला एवढा माज असतो का? याच्यापेक्षा अनेक मोठमोठे अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेले प्रसिद्ध कलाकार हे सुद्धा बिग बॉसच्या घरात आलेले आहेत.

आणि मांजरेकरांनी या स्पर्धकांची सुद्धा शाळा घेतली पण ते स्पर्धक कधीही मांजरेकरांना उलट आणि उद्धटपणे बोलले नाही. तर मांजरेकर आपल्या चांगल्यासाठीच म्हणजेच आपला खेळ चांगला व्हावा यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करताय. असाच या स्पर्धकांनी समजलं होतं, म्हणूनच मांजरेकरांचं बोलणं त्यांनी एका चांगल्या दृष्टीने घेतलं.

मांजरेकर दर आठवड्याच्या चावडीत अनेक स्पर्धकांची शाळा घेतात. अर्थात ते तेच मुद्दे घेतात जे सोशल मीडिया वर ती प्रेक्षक मांडतात. एक प्रकारे मांजरेकर हे प्रेक्षकांचे प्रतिधित्व करून या स्पर्धकांना जाब विचारत असतात. अनेक प्रसंगी त्यांना खडे बोल सुनावतात. त्यांची चांगलीच शाळा घेतात आणि चांगलं खेळलं तर त्यांचं कौतुकही करतात.

अर्थात ते जे बोलतात ते एक प्रकारे प्रेक्षकांची प्रतिक्रियाच असते. यातून अपेक्षा असते की, या आठवड्यात जास्त स्पर्धकांची शाळा घेतली, त्या स्पर्धकांनी पुढील आठवड्यात प्रेक्षकांचे मनोरंजन होईल, असा चांगला खेळ दाखवावा आणि त्यासाठीच मांजरेकर चावडीवर शाळा घेतात. पण अपूर्वा नेमळेकरची पहिली आठवड्यात मांजरेकरांनी शाळा घेतली.

त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात तिचा भांडखोरपणा काहीसा कमी झाला. पण तिचा उद्धटपणा मात्र सुरूच होता .इतर बाकीच्या पंधरा स्पर्धकांपेक्षा शारीरिक आणि मानसिकरित्या कमजोर असणाऱ्या विकास सावंत याला अपूर्वा नेमळेकर सतत टार्गेट करत होती. किरण माने तर सध्या तिच्या रडारवरच आहेत. अपूर्वा नेमळेकरचे सतत नेहमी मी करण्याची प्रवृत्ती तसेच ती स्वतःला एक उत्तम लीडर समजते.

म्हणूनच घरात सर्वांनी तिचेच ऐकावं. ते दुसऱ्याना कसेही मोठ्या आवाजात बोलली तरी चालेल. पण इतरांनी मात्र तिला खाली आवाजात आणि बोट खाली करूनच बोलावं, असं तिला वाटत असतं. तसेच त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांच्या दुसऱ्या ग्रुपमधील सदस्यांबद्दल कान भरणं, त्याच्या ग्रुपमध्ये सदस्यांना भडकवून सगळे तिलाच कसं टार्गेट करतात, असं दाखवणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला ओवर स्मार्ट समजून दुसऱ्याला कमी समजत त्याला टोमणे मारणं.

सतत दुसऱ्यांच्या चुका काढणं, असे काही प्रकार अपूर्वा करत असते. पण अपूर्वा नेमळेकरला स्वतःच्या चुका दिसत नाही आणि दुसऱ्याने जर हिच्या चुका दाखवल्या तर तिला अजिबात ही आवडत नाही. प्रत्येक गोष्टीच तिच्याकडे स्पष्टीकरण असतं. तिच्यामध्ये तिने काहीही केलं तरी ते योग्यच. चावडीवर अगोदर महेश मांजरेकर यांनी सुद्धा तिची चूक दाखवत तिची शाळा घेतली. तरी ते सुद्धा तिला आवडलं नाही.

यानंतर आता अक्षय आणि तिची जोडी आहे. तसं मांजरेकर म्हणाले ते खरंच आहे. ज्या प्रकारे अपूर्वा नेमळेकर ही सतत अक्षयची बाजू घेत असते आणि तिला सतत अक्षय सोबतच खेळायच असतं या प्रकारामुळेच मांजरेकर अक्षय आणि अपूर्वाला विक्रम वेताळची दुसरी जोडी असे म्हणाले. पण हे अपूर्वा नेमळेकरला मात्र आवडलं नाही. तर मांजरेकरांनाच ती उद्घाटपणे उलटून बोलायला लागली.

त्यामुळे मांजरेकर सुद्धा अपूर्वा नेमळेकरवर प्रचंड संतापले, तर मंडळी अपूर्वाच्या उद्घाटपणावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा.

Team Hou De Viral