नेमकं अपूर्वा सोबत तिचा नवरा ‘असं’ काय वागलाय, ज्यामुळे तिने लग्नाबाबत बोलणंच टाळलं…

नेमकं अपूर्वा सोबत तिचा नवरा ‘असं’ काय वागलाय, ज्यामुळे तिने लग्नाबाबत बोलणंच टाळलं…

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. यामध्ये अपूर्वा नेमळेकर ही देखील सहभागी झाली आहे. अपूर्वा नेमळेकर ही अतिशय चांगली अभिनेत्री आहे. या आधी तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

आभास हा या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर रात्रीच खेळ चाले मधील तिची भूमिका ही लोकप्रिय ठरली होती. आता अपूर्वा नेमळेकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारे या बिग बॉस मध्ये गप्पा करताना बसलेल्या होत्या. यावेळेस अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या लग्नाचा विषय टाळून दिला, तर आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता आणि अण्णा नाईक यांची जोडी प्रेक्षकांना ही प्रचंड आवडली. अण्णा नाईक ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांनी साकारलेली होती. माधव अभ्यंकर यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. शेवंता ही भूमिका अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेली होती.

तिने ‘आभास हा’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिचा जन्म 27 डिसेंबर 1988 दादर येथे झाला आहे. दादर येथे तिने रुपारेल कॉलेज येथून बी ए एम एस मध्ये पदवी मिळवलेली आहे. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने अनेक मालिका व चित्रपटातून देखील काम केलेले आहे.

तिला व्यावसायिक रंगभूमीवर देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मालिकांमध्ये प्रत्येक चॅनलवर तिने भूमिका केलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अपूर्वा हिने युवा सेनेचा पदाधिकारी रोहन देशपांडे यांच्यासोबत लगीन गाठ बांधली होती. मात्र, लग्नाच्या काही महिन्यातच या दोघांमध्ये प्रचंड भांडणाला सुरुवात झाली. त्यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे, असे सांगण्यात येते. आता हे दोघेही वेगळे राहतात.

अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉसच्या चौथ्या भागामध्ये सहभागी झाली आहे. येथे ती आपली जादू दाखवताना देखील दिसत आहे. अपूर्वा नेमळेकर ही या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रसाद जवादे याच्याशी तिचे भांडण झाले होते. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी अपूर्वा हिला समज देखील दिली होती. आता अपूर्वा नेमळेकर आणि तेजस्विनी लोणारे या दोघी बिग बॉसच्या शोमध्ये गप्पा करताना दिसत आहेत.

यामध्ये अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या लग्नाचा विषय हा सपशेल टाळून दिला आणि त्याबद्दल तिने बोलायचे टाळले, तर अपूर्वाच्या घटस्फोटाचे कारण यामागे आहे, असे बोलले जाते, तर आपल्याला अपूर्वा नेमळेकर आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral