अंबाबाईच्या रूपातील या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखला का ? ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये केलंय काम

अंबाबाईच्या रूपातील या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखला का ? ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये केलंय काम

नवरात्र सुरू होऊन आता चार ते पाच दिवसाचा अवधी झाला आहे. नवरात्रामध्ये अनेक जण वेगवेगळ्या उपासना करत असतात. तर अनेक जण घटस्थापना देखील आपल्या घरी करतात. त्यांच्या घरी घटस्थापना होते ते नऊ दिवस अतिशय व्रतस्थ राहतात. या कालावधीमध्ये अभद्र कामे करू नये, असे देखील सांगण्यात येते.

याला धार्मिक कारण देखील आहे अनेक अभिनेता व अभिनेत्री देखील नवरात्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसत असतात. महालक्ष्मी, अंबाबाई, तुळजाभवानी या देवीची पूजा देखील हे मोठ्या मनोभावाने करत असतात आणि नऊ दिवस नवरात्रामध्ये उपवास देखील करणार असतात.

काही कलाकार हे नवरात्रामध्ये देवीचे वेगवेगळे रूपाचे चित्रीकरण देखील करत असतात.आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. त्या अभिनेत्रीने अंबाबाईचे रूप साकारून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. कारण ती या फोटोमध्ये कोणालाच ओळखू येत नाही.

या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर असे आहे. अपूर्वाचा जन्म 27 डिसेंबर 1998 रोजी दादर येथे झालेला आहे. तिने रुपारेल कॉलेज येथून बीएएमएसची पदवी मिळवलेली आहे, असे असतानाही तिने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आणि यामध्ये ती यशस्वी देखील झाली आहे.

सगळ्यात आधी अपूर्वा हिने ‘आभास हा’ या मालिकेत काम काम करताना दिसली होती. अपूर्वा नेमळेकर हिने इंटरनॅशनल ज्वेलरी आणि साड्यांचा व्यवसाय सुरू केला असल्याचे सांगण्यात येते. तिने हा व्यवसाय महाराष्ट्राच्या मोठ्या शहरात सुरू करण्याऐवजी छोट्या शहरात सुरू केला आहे. म्हणजे तिने मुंबई पुण्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यापेक्षा साताऱ्याची निवड केली आहे.

साताऱ्यामध्ये तिने आपला हा व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या दुकानांमध्ये अनेक ग्राहक येत असतात आणि तिच्या दुकानातील साड्या देखील घेऊन जात असतात. या माध्यमातून तिला चांगले अर्थार्जन होत असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसापूर्वीच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्ट मध्ये तिने एक देवीचा फोटो शेअर केला आहे. सुरुवातीला हा फोटो कोणाचा आहे ते अनेकांना ओळखता आली नाही. अंबाबाईचा रूपामध्ये तिने हे चित्रीकरण केले आहेत आणि देवीप्रती आपली भावना व्यक्त केली आहे. तिच्या या फोटोला अनेकांनी लाईक आणि शेअर देखील केले आहे. तर आपल्याला अपूर्वा आपल्याला आवडते का? ते आम्हाला सांगा.

Team Hou De Viral