बिगबॉस च्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी ह्या स्पर्धकाला घातल्या प्रचंड शिव्या

बिगबॉस च्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी ह्या स्पर्धकाला घातल्या प्रचंड शिव्या

कलर्स मराठी या वाहिनीवर बिग बॉसचे चौथे सत्र नुकतेच सुरू झाले आहेत चौथ्या सत्रामध्ये आता अनेक कलाकार सहभागी झाल्याचे आपण पाहत आहोत यामध्ये अपूर्वा नेमळेकर हे देखील सहभागी झाली आहे अपूर्वा नेमळेकर यांनी याआधी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

यासोबतच बिग बॉस मध्ये इतर कलाकारही सहभागी झाले आहेत आता अपूर्वा नेमळेकर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे याबद्दलची आपल्याला माहिती देणार आहोत. रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता आणि अण्णा नाईक यांची जोडी प्रेक्षकांना ही प्रचंड आवडली होती.

अण्णा नाईक ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांनी साकारलेली आहे. माधव अभ्यंकर यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. आम्ही आज आपल्याला या मालिकेतील शेवंता बद्दल माहिती देणार आहोत. शेवंता ही भूमिका अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेली आहे. तिने ‘आभास हा’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.

त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिचा जन्म 27 डिसेंबर 1988 दादर येथे झा ला आहे. दादर येथे तिने रुपारेल कॉलेज येथून बी ए एम एस मध्ये पदवी मिळवलेली आहे. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने अनेक मालिका व चित्रपटातून देखील काम केलेले आहे. तिला व्यावसायिक रंगभूमीवर देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

मालिकांमध्ये प्रत्येक चॅनलवर तिने भूमिका केलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अपूर्वा हिने युवा सेने चा पदाधिकारी रोहन देशपांडे यांच्यासोबत लगीन गाठ बांधली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे वेगळे राहत असल्याची देखील चर्चा आहे. मात्र, याबाबत अजूनही काही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे अपूर्वा सध्या कुणा सोबत राहते, याचे उत्तर तीच देऊ शकते.

आता अपूर्वा नेमळेकर हिला प्रेक्षकांच्या शिव्या खाव्या लागत आहेत. याचे कारण म्हणजे अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉसच्या घरात सहभागी झाली आहे. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर हिचा तिचा सहकारी स्पर्धक प्रसाद जवादे यांच्यासोबत प्रचंड वाद झाला. यावेळेस अपूर्वा नेमळेकर हिने त्याला अर्वाची भाषेत शिवीगाळ देखील केल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे तिला प्रेक्षकांनी आता चांगलेच झोडले आहे आणि अनेकांनी तिच्यावर टीका देखील केले आहे की, या अभिनेत्रीचा एटीट्यूड हा खूपच भयंकर आहे. तिला कुठलातरी धडा शिकवायलाच पाहिजे, अशा पद्धतीने ती आपल्या सहकारी अभिनेत्यासोबत अशी कशी बोलू शकते, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. तर आपल्याला अपूर्वा नेमळेकर हिच्या अशा वागण्याबद्दल काय म्हणायचे, आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral