‘हिला आधी घराबाहेर हाकलून द्या’, हि लोकप्रिय अभिनेत्री या स्पर्धकावर भडकली

‘हिला आधी घराबाहेर हाकलून द्या’, हि लोकप्रिय अभिनेत्री या स्पर्धकावर भडकली

बिग बॉस या शोमध्ये सध्या भांडण, राडे, मारामाऱ्या होताना खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. सध्या कोणाचाही कुणावर विश्वास नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या शोमध्ये अनेक स्पर्धक हे वेगवेगळ्या टास्क दरम्यान आपल्या सहकारी स्पर्धकावर संशय घेताना दिसत आहेत.

कलर्स मराठी वर 2 ऑक्टोबर पासून बिग बॉसचे चौथे सत्र सुरू झाले आहे. या चौथ्या सत्रामध्ये अनेक स्पर्धक हे सहभागी झाले आहेत. त्यामध्ये प्रसाद जवादे, अमृता देशमुख, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, विकास सावंत, यशस्वी मसुरेकर, योगेश जाधव, डॉक्टर रोहित शिंदे, रुचिरा जाधव, समृद्धी जाधव या कलाकारांसह अनेक कलाकार हे सहभागी झाले आहेत.

आता या शोदरम्यान पहिले नॉमिनेशन देखील झाले आहे. त्यानुसार निखिल राज शिर्के हा या शोच्या बाहेर पडला आहे, तर इतर कलाकार देखील आता शोकमधून कुणाचा नंबर लागतो याची वाट पाहताना दिसत आहेत. अलीकडेच झालेल्या आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी मेघा घाडगे हिला चांगलेच सुनावले होते.

कारण मेघा घाडगे ही देखील आता अपूर्वा नेमळेकर हिच्याप्रमाणेच खेळताना दिसत आहे. योगेश जाधव याला भिकारी असे तिने म्हटले आहे. त्यामुळे महेश मांजरेकर हे तिच्यावर चांगले संतापल्याचे पाहायला मिळाले. महेश मांजरेकर यांनी मेघा हिला सांगितले की, तू देखील आता त्या अपूर्वा सारखेच खेळत आहेस का? तुम्ही असे खेळू नका.

तुम्ही व्यवस्थित खेळा नाहीतर प्रेक्षक तुम्हाला तातडीने बाहेर काढतील. तर अलीकडेच झालेल्या बिग बॉसच्या शोमध्ये विकास सावंत हा खूपच रडला होता. कारण किरण माने हे त्याला साथ देत नव्हते. किरण माने त्याला म्हणत होते की, आता तू तुझा खेळ पाहून घे. मी तुला कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नाही.

त्यामुळे विकास सावंत हा देखील या शोमध्ये धीराने लढणार असे त्यांनी सांगितले. आता बिग बॉस मधला हा सगळा भांडणाचा प्रकार पाहून बिग बॉस तीन मधील स्पर्धक व अभिनेत्री चांगलीच भडकल्याची पहायला मिळत आहे. बिग बॉस तीन मध्ये सहभागी झालेली सुरेखा कुडची ही या सगळ्या प्रकारावर चांगलीच भडकली आहे.

सोशल मीडियावर तिने एक पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये सुरेखा कुडची ही म्हणते की, त्या योगेश जाधवला किती त्रास देणार. कॅप्टन ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी कोणी असे बोलते का? त्याला भिकारी म्हणणार का? एकूणच काय तर बिग बॉसच्या घरामध्ये अतिशय विचित्र वातावरण आहे, असे सुरेखा कुडची हिने म्हटले आहे.

आता या शोमध्ये चांगला खेळ अपेक्षित आहे, असे तिने म्हटले आहे.

Team Hou De Viral