‘टाईट कपडे’ घातल्यामुळे रोहित रुचिरावर भडकला, तू हे काय घातलेस..

आपल्या जोडीदाराने कुठले कपडे घालावे यासाठी काही जोडीदार हे हट्ट धरून बसतात. यामध्ये सर्वच नसतात. आता यामध्ये मग सेलिब्रिटी देखील मागे नसतात. सेलिब्रिटी देखील आपल्या पार्टनरने काय घालावे काय घालू नये यासाठी ते आग्रही असतात.
असाच काहीसा प्रकार बिग बॉसच्या घरामध्ये देखील समोर आला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. यामध्ये रुचिरा, रोहित शिंदे हे देखील सहभागी झाले आहेत. ही जोडी कपल आहे, या जोडीने बिग बॉस हा शो सुरू होण्याच्या सुरुवातीलाच एका ट्रेलर मध्ये धुमाकूळ उडवून दिला होता.
बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी होण्याच्या आधी हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळेस या दोघांनी अतिशय हॉट असा परफॉर्मन्स दाखवला होता. त्यांच्या या प्रोमोवर अनेकांनी टीका देखील केली होती. मात्र, कालांतराने आता हा विरोध देखील मावळला आहे.
घरामध्ये आपल्याला अपूर्वा नेमळेकर, प्रसाद जवादे, किरण माने, विकास सावंत, यशश्री मसुरेकर, तेजस्विनी लोणारे, अमृता देशमुख रुचिरा, समृद्धी जाधव, योगेश, त्रिशूल यांच्यासह इतर कलाकार सहभागी झाल्याचे दिसत आहेत. यामध्ये किरण माने हे देखील सहभागी झाले आहेत. किरण माने हे मध्यंतरीच्या काळात खूपच वादग्रस्त ठरले होते.
मुलगी झाली हो या मालिकेमुळे ते वादात अडकले होते. मात्र, आता त्यांचा वाद देखील संपला आहे, असेच म्हणावे लागेल.रुचिरा आणि रोहित हे एकाच टीम मध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र, असे असताना रोहित याने रुचीरा हिला आपल्या टीममध्ये स्पर्धक म्हणून घेतलेले आहे. त्यानंतर रुचिरा ही देखील चिडली होती. मात्र, त्यांच्यामधील वाद नंतर संपुष्टात आला होता.
मात्र, आता रुचिराच्यावर रोहित हा चांगलाच चिडला आहे. याचे कारण म्हणजे रुचिरा हिने घातलेले कपडे आहेत. रुचिरा ही घरामध्ये याच कपड्यामध्ये वावरत आहे. त्यामुळे रोहित हा चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबतचा हा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रुचिरा ही अतिशय टाईट कपड्यामध्ये घरामध्ये वावरत आहे.
तिने हे कपडे योगाचे कपडे घातलेले आहेत. हे कपडे पाहूनच रोहित हा रुचिरा हिला सांगितले की, तू हे कपडे बदल. हवे तर टॉप घाल. मात्र, हा योगाचा ड्रेस घालू नको, असे तो म्हणताना दिसत आहे. रोहित याने असे म्हटल्यावर रुचिरा हे म्हणत आहे की, मी फार कमी कपडे आणलेले आहेत आणि माझा हा योगाचा ड्रेस आहे. यामध्ये काय कमी आहे, असे ती म्हणताना दिसत आहे.
त्यानंतर रोहित हा बाजूला जाऊन बसतो आणि त्यानंतर काही वेळानंतर रुचिरा त्याच्यापाशी येते आणि तू काही काळजी करू नको, असे म्हणते. तुला जे वाटते त्याची मी काळजी घेईल. माझ्या प्रायव्हेट पार्ट बद्दल मी काळजी घेईल आणि व्यवस्थित बसेल, असे म्हणते. त्यानंतर आता या दोघांमध्ये पुन्हा वाद थांबतो असेच दिसत आहे.