सुशांत सोबतच्या ‘त्या’ इंस्टाग्राम चॅटचा स्क्रीनशॉट अर्जुन कपूरने केला शेअर ! जाणून घ्या त्या चॅटमध्ये होत तरी काय ?

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या नि धनाने संपूर्ण बॉलीवूड हादरलं आहे. सुशांतच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. कुटुंबीय तर अद्याप या घटनेमुळे सावरलेलं नसून सुशांतच्या या अशा अचानक जाण्याचा धक्का त्याच्या चाहत्यांना देखील तितकाच बसला आहे. आणि या वृत्तावर विश्वास ठेवणे प्रत्येकाला कठीण वाटत होते.
अशा परिस्थितीत आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने 18 महिन्यांपूर्वी सुशांत सिंग राजपूतसोबतच्या त्यांच्या चॅटचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अर्जुन आणि सुशांतच्या या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ही चॅट 13 डिसेंबर 2018 रोजी दोघांमध्ये झालेली आहे. गप्पांच्या सुरूवातीला अर्जुन त्याला म्हणतो, “तूला माझ्याकडून आलिंगन.” त्याला रिप्लाय देत सुशांत त्याला म्हणतो, “आय लव यू ब्रदर, मला माहिती आहे तूच मला ओळखतो.” या गप्पांमध्ये अर्जुनसुद्धा सुशांतला त्याच्या ‘केदारनाथ’ चित्रपटासाठी अभिनंदन करताना दिसतो आणि सुशांतसुद्धा एक दिवस त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो.
या स्क्रीनशॉटच्या कॅप्शनमध्ये अर्जुन लिहितो, 18 महिन्यांपूर्वी माझ्याकडून त्याला शेवटचा मेसेज तेव्हा पाठवला गेला होता. जेव्हा ‘केदारनाथ’च्या रिलीजनंतर आईची आठवण देणारी पोस्ट त्याने एक पोस्ट लिहिली होती. जेव्हा लोक चित्रपटाबद्दल आनंद साजरा करत होते, तेव्हा सुशांत हा आपल्या आईची आठवण काढत होता.
अर्जुन म्हणाला की तो सुशांतला फार चांगला ओळखत नाही, परंतु यशराज फिल्म्स, इव्हेंट्स, स्क्रीनिंग इत्यादी वेळी तो त्याला भेटला आहे. त्याने पुढे असेही लिहिले आहे की, सुशांतचे असे पाऊल उचलण्यामागच्या त्याच्या भावना मी समजू शकतो. कारण मी ही त्या वेदना समजू शकतो. ज्या सुशांतने आपल्या आईला गमावल्याबद्दल आणि त्याच्या एकांतवासात त्याने अनुभवल्या आहेत.
अर्जुनने लिहिले आहे कि, आता मला आशा आहे की, माझा मित्र एका उत्कृष्ठ आणि आनंदी जगामध्ये आहे. मला आशा आहे की, त्या ठिकाणी त्याला जरूर शांती मिळेल.दरम्यान, बॉलीवूड कलाकारांनी ट्विटरवर ट्वीट करून त्याला श्रद्धांजली वाहिली असून राजकारणातील आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींनी देखील त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आमच्या इतर बातम्या –
कोण आहे रिया चक्रवर्ती, सुशांतच्या निधनानंतर होतेय तिची चर्चा
‘अंकिता लोखंडेला तो नेहमी….’ सुशांतबाबत डॉक्टरांनी केला मोठा खुलासा