‘आई कुठे काय करते’ मधील सासू-सुनेची जोडी थिरकणार स्टारप्रवाह परिवार अवॉर्ड च्या स्टेज वर

‘आई कुठे काय करते’ मधील सासू-सुनेची जोडी थिरकणार स्टारप्रवाह परिवार अवॉर्ड च्या स्टेज वर

छोट्या पडद्यावर मालिका या खूप लोकप्रिय होत आहेत. त्यातल्या मराठी मालिका या चालत आहेत. समाजामध्ये जे घडते त्याचे चित्रण हे मालिकांमधून सहजासहजी दाखवलेले असते. केवळ यामध्ये ट्विस्ट येण्यासाठी काही मसाला देखील भरण्यात येतो.

मात्र, आपल्या अवतीभवती ज्या घटना घडत असतात त्याच मालिका किंवा चित्रपटांमध्ये दाखवत असतात. काही वर्षांपूर्वी ई टीव्ही मराठीवर चार दिवस सासूचे ही मालिका प्रचंड गाजली होती. रोहिणी हट्टंगडी यांनी या मालिकेत अफलातून अशी भूमिका केली होती. त्यानंतर कौटुंबिक मालिकांचा पेटारा प्रेक्षकांसाठी उघडण्यात आलेला आहे.

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका धुमाकूळ करत आहेत. आई कुठे काय करते, सहकुटुंब सहपरिवार यासारख्या मालिकांनी अक्षरश धुमाकूळ घातला आहे. त्याच्यात आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड सध्या गाजत आहे. या मालिकेत अनेक मनोरंजनात्मक किस्से समोर येत आहेत. अनिरुद्ध सध्या संजना हिच्यासोबत राहायला गेलेला आहे. त्यामुळे या मालिकेत अनेक ट्विस्ट घडत आहेत.

आता मालिकेमध्ये अनाघाचे लग्न झाल्याचे आपण पाहिले आहे, तर अरुंधती हीदेखील आता तिच्या दुसऱ्या घरी राहायला गेली आहे. यामध्ये अशुतोष हा तिला सर्व काही मदत करतो, तर मालिकेमध्ये आता वेगवेगळे प्रसंग पाहिला देखील मिळणार असल्याचे समोर येत आहे. मात्र आता ही मालिका लवकर बंद करावी, अशी मागणी देखील प्रेक्षक करताना दिसत आहेत.

याचे कारण म्हणजे या मालिकेत अनेक गैरप्रकार दाखवण्यात आले आहेत, असे अनेकांचे म्हणणे आहे. या मालिकेमध्ये अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले हिने साकारली आहे, तर मालिकेमध्ये अनघा ही भूमिका अश्विनी महांगडे हिने साकारली आहे. या दोघींची सासू-सुनेची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडलेली आहे.

रूपाली भोसले हिने संजनाचे पात्र अतिशय जबरदस्त या मालिकेत साकारले आहे. तर आता अनघा आणि अरुंधती या जोरदारपणे डान्स करत आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ म्हणजे या दोघी सासू सुना आता एका अवॉर्ड सोहळ्यामध्ये डान्स करताना दिसणार आहेत.

हा सोहळा स्टार प्रवाह परिवाराचा सोहळा आहे. याबाबत या दोघींनीही आपले अनुभव सोशल मीडियाशी बोलताना शेअर केले आहेत, अळा प्रकारे सून आणि सासू डान्स करतात ते पाहणे प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक असेल आणि आमचा देखील अनुभव अतिशय वेगळा होता, असे दोघींनी सांगितले आहे.

या दोघीही रंगीत तालीम करताना डान्स करत आहेत. त्यामुळे त्या प्रत्यक्षात स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात या जोडीचा धमाकेदार डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Team Hou De Viral