‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘अश्विनी महांगडे’ चा खरा लाईफ पार्टनर आला समोर, पहा फोटो

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘अश्विनी महांगडे’ चा खरा लाईफ पार्टनर आला समोर, पहा फोटो

अश्विनी महागडे हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर येते आई कुठे काय करते ही मालिका. अश्विनी महांगडे ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिचे अभिनय कौशल्याचे नेहमीच कौतुक केले जाते.आई कुठे काय करते या मालिकेप्रमाणेच तिने अनेक मालिकांमध्ये तसेच काही चित्रपटात देखील काम केले आहे.

प्रामुख्याने सांगायचे झाले तर अस्मिता ही मालिका. यानंतर झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. या मालिकेत राणू आक्काची भूमिका अश्विनीने केली होती.अश्विनीची राणू अक्का ही भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली आहे. तसेच तिने चित्रपटात देखील काम केले आहे. टपाल आणि बॉईज या चित्रपटात काम केले आहे.

सध्या अश्विनी ही आई कुठे काय करते या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती अनघाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत सध्या अश्विनी म्हणजेच अनघा हिचे अभिषेक सोबत लग्न झाले असल्याचे आपण पाहिले आहे. आता या मालिकेत अनघा अरुंधतीची जागा घेत आहे, हे आपण बघत आहोत. अनघा ही देशमुख कुटुंबातील प्रत्येक सदस्याची खूप छान काळजी घेत असते.

ज्याप्रमाणे अरूंधती घरातील सर्व सदस्यांची काळजी घेते, त्याचप्रमाणे अनघा देखील करत असते. त्यामुळे दुसरी अरुंधती आपल्या घरात आली आहे, असे देशमुख कुटुंबीयांना वाटत असते. परंतु अरुंधती अनघाला सांगते की तू माझ्यासारखी सर्व बंधने घालून न घेता जॉब हा करायचा. यावर अभिषेक देखील हो म्हणतो.

घरात तिला कसलेही बंधन घातले जात नाही, हे पाहून अरुंधतीला खूप बरे वाटते. या मालिकेत आता नवीन वळण आले आहे. या वळणात अरुंधती आता देशमुख कुटुंबीयांचे घर सोडून जाणार आहे. अनघा तिच्या ताईची साथ कधीच सोडणार नाही, असे ती तिच्या ताईला वचन देते. त्याचप्रमाणे ती आपल्या ताईला म्हणजेच अरुंधतीला वेळोवेळी मदत करते.

अरुंधतीला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शनही करत असते. असे हे अनघाचे उत्कृष्ट पात्र या मालिकेत दाखवण्यात आले आहे. अनघा खूप शांत समजूतदार असे पात्र या मालिकेत दाखवण्यात आले आहे. ज्याप्रमाणे नुकतेच अभिषेक व अनघाचे लग्न झाले आहे, त्याचप्रमाणे अनघाचा म्हणजेच अश्विनी महांगडेच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीचे आगमन झाले आहे.

या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी अश्विनीने खास अंदाजात शुभेच्छा देत सोशल मीडियावर तिने फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने प्रेमाची कबुली देखील दिली आहे. या तरुणाचे नाव नीलेश जगदाळे असे आहे. ती सध्या निलेश जगदाळे यांना डेट करत आहे. पहिल्यांदाच अश्विनी ने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

निलेश यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Team Hou De Viral