‘आई कुठे काय करते’ मधील ‘ह्या’ अभिनेत्रीचा मालिकेतून ब्रेक ? वारकऱ्यांसोबत पायी वारीला जाणार…

‘आई कुठे काय करते’ मधील ‘ह्या’ अभिनेत्रीचा मालिकेतून ब्रेक ? वारकऱ्यांसोबत पायी वारीला जाणार…

राज्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथा पालथ झाली. मात्र या दरम्यान सुरू असलेल्या पंढरीच्या वारीकडे अनेकांची दुर्लक्ष झाले. पंढरीच्या वारीला हवी तशी प्रसिद्धी यामुळे मिळाली नाही, अशी खंत देखील अनेकांनी व्यक्त केली आहे.

विठुरायाच्या दर्शनाला लाखो वारकरी हे दरवर्षी आसुसलेले असतात. गजानन महाराज यांची पालखी ही मोठ्या नेटाने शेगावहून पंढरीला जात असते. मात्र, विशेष करून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींची उत्सुकता सगळ्यांनाच असते.

या पालखीचे पंढरपूर वारीदरम्यान अनेक ठिकाणी मुक्काम असतात आणि ठिकाणी रिंगण देखील भरवण्यात येते. भव्य दिव्य असा हा सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक हे देखील आवर्जून हजेरी लावतात आणि ज्या गावांमध्ये पालखीचा मुक्काम असतो, त्या गावांमध्ये जणूकाही दिवाळी साजरी होते. सर्व गावकरी मिळून वारकऱ्यांच्या जेवणाची सोय आणि सर्व काही करत असतात.

हे आमचे भाग्य आहे, असे देखील अनेक जण सांगत असतात. आता पंढरपूरची आषाढी एकादशी लवकरच होणार आहे. यावर्षी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना विठ्ठलाची पूजा करण्याचा मान पहिल्यांदाच मिळणार आहे. आता एक अभिनेत्री देखील वारीमध्ये सहभागी झाली आहे. आई कुठे काय करते मालिकेमध्ये ही अभिनेत्री सध्या काम करत आहे.

अश्विनी महांगडे हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर येते आई कुठे काय करते ही मालिका. अश्विनी महांगडे ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिच्या अभिनय कौशल्याचे नेहमीच कौतुक केले जाते.आई कुठे काय करते या मालिकेप्रमाणेच तिने अनेक मालिकांमध्ये तसेच काही चित्रपटात देखील काम केले आहे. प्रामुख्याने सांगायचे झाले तर अस्मिता ही मालिका.

यानंतर झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. या मालिकेत राणू आक्काची भूमिका अश्विनीने केली होती.अश्विनीची राणू अक्का ही भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली आहे. तसेच तिने चित्रपटात देखील काम केले आहे. टपाल आणि बॉईज या चित्रपटात काम केले आहे. सध्या अश्विनी ही आई कुठे काय करते या मालिकेत काम करत आहे.

या मालिकेत ती अनघाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत सध्या अश्विनी म्हणजेच अनघा हिचे अभिषेक सोबत लग्न झाले असल्याचे आपण पाहिले आहे. अश्विनी ही मोठ्या थाटामाटात आता वारीमध्ये सहभागी झाली आहे. वारीमध्ये सहभागी होताना तिने अतिशय भारदस्त अशी साडी घातली आहे. दागिने घातले आहे.

डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले आहे आणि या भारदस्त साडी मध्ये ती महिलांसोबत फुगडी खेळताना दिसत आहे. मात्र, अनेकांनी तिच्या अशा सहभागी होण्यावर टीका देखील केली आहे. कारण की वारकऱ्यांमध्ये जायचं असेल तर एवढा नट्टापट्टा करून कशाला जायचे, असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

मात्र, या टीकेकडे कडे दुर्लक्ष करून ती वारकऱ्यासोबत विठूनामाचा गजर करताना दिसत आहे. आता अश्विनी ही आपल्या भक्ती भावाने वारीत सहभागी झाली आहे का? तिला काही फोटो सेशन किंवा कुठे मॉडेलिंगसाठी असाइनमेंट मिळाली आहे? हे मात्र कळाले नाही.

मात्र, एकूणच तिच्या ड्रेसिंग वरून असे वाटत आहे की ती काहीतरी प्रोजेक्ट घेऊन या वारीमध्ये सहभागी झाली असावी.

Team Hou De Viral