‘ऑस्ट्रेलिया’ चा हा क्रिकेटपटू झाला भारताचा ‘जावई’

‘ऑस्ट्रेलिया’ चा हा क्रिकेटपटू झाला भारताचा ‘जावई’

ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशांची नाते अतिशय चांगले आहे. या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट तसेच हॉटेल आणि शैक्षणिक दृष्ट्या देवान-घेवान होताना दिसते. आज ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात देखील अनेक जण कार्यरत आहेत.

काही प्रसंग सोडले तर या दोन्ही देशांत खूप चांगल्या प्रकारे जमते. गेल्या काही वर्षात भारत ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये देखील अनेक सामने आपण पाहिले आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणी शेन वार्न यांची जुगलबंदी ही सर्वांनी पाहिली आहे. सचिन तेंडुलकर हा आपल्या स्वप्नात देखील येत असल्याचे शनिवारी यांनी सांगितले होते.

आता शेन याचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर सचिन तेंडुलकर याने सगळ्यात आधी प्रतिक्रिया नोंदवली होती. सध्याच्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये अनेक असे खेळाडू आहेत की, जे लोकप्रिय ठरले आहेत. यामध्ये मॅक्सवेल हा देखील चर्चा आलेला आहे. आता तो चर्चेत येण्याचे कारण देखील तसेच आहे.

कारण की त्याने मूळ भारतीय असलेल्या तरुणीसोबत लग्न केले आहे. ही तरुणी गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये राहत असत असल्याचे सांगण्यात येते. त्याच वेळी त्यांची एकदा भेट झाली आणि त्यांच्यामध्ये प्रेम संबंध जुळले.

या खेळाडूचे नाव ग्लेन मॅक्सवेल असे आहे. ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आहे. मॅक्सवेल हा सोशल मीडियावर लेखन खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो आणि आपले अनेक फोटो देखील तो यावर शेअर करत असतो. आता मॅक्सवेल देखील चर्चेत आलेला आहे. कारण त्याने भारतीय वंशाच्या तरुणीसोबत लग्न केले आहे.

काही दिवसांपूर्वी या दोघांनी साखरपुडा केला आहे. 2019 मध्ये मॅक्सवेलला मानसिक कारणामुळे खूप तणावाला सामोरे जावे लागले होते. यामुळे त्याने क्रिकेटमधून ब्रेक देखील घेतला होता. त्यावेळेस या तरुणीने त्याला मानसिक आजारातून बाहेर काढण्यामध्ये मदत केली होती. या तरुणीचे नाव विनी रमण असे आहे.

विनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे गेल्या काही वर्षापासून राहते. ती ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेली आहे. ती फार्मासिस्ट असून दोघेही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या आजारपणा मध्ये विनी हिने मॅक्सवेल ला खूप मदत केली होती. 27 मार्च रोजी या दोघांचे लग्न झाले आहे.

त्या दोघांनी आयपीएलच्या आधीच आपला साखरपुडा उरकला आणि साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसत होते. आतादेखील या दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहे त्या फोटोवर देखील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कमेंट देखील केल्या आहेत.

Team Hou De Viral