थंडीच्या दिवसांमध्ये आवळा खाणे आहे खूपच फायदेशीर.. कधी आणि कसा खावा जाणून घ्या..

भारतामध्ये अनेक फळ आहेत की त्याची चवही जगा वेगळीच आहे. त्यातला एक पदार्थ असा आहे की, त्याचे अनेक उपयोग आहेत. आवळा हा पदार्थ खूपच रुचकर आणि चांगला असतो. आवळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विटामिन सी चे प्रमाण असते. आवळ्याच्या सेवनाने आपण अनेक रोगांवर मात करू शकता. आवळा मुळे आपली प्रतिकारशक्ती देखील वाढत असते. आपल्या किडनी मधील विषयुक्त पदार्थ बाहेर टाकण्याचे काम देखील आवळा करतो.
किडनीला डिटॉक्स देखील करत असतो.त्यामुळे आवळ्याच्या सेवन आपण नेहमी केलेच पाहिजे. मात्र, या थंडीच्या दिवसात अधिकाधिक प्रमाणात घेतला पाहिजे. यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. आपण आवळ्याचे विविध प्रदार्थ करून देखील खाऊ शकतो. आपण आवळा कशाही प्रकारे खाऊ शकतो. पावडर खाऊ शकतो, मुरब्बा खाऊ शकतो, लोणचे खाऊ शकतो, आवळ्याचा ज्युस देखील घेऊ शकतो. आवळ्याचे अनेक असे उपाय आहेत. आम्ही आपल्या लेखांमध्ये आवळा सेवन केल्याने काय फायदे होतातहे सांगणार आहोत थंडीच्या दिवसांमध्ये तर आवळ्याचे सेवन करावे.
1) प्रतिकारशक्ती : आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी चे गुणधर्म असतात. तसेच बॅक्टेरीयल गुण आवळ्यात असतात. त्यामुळे जर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत झाली असेल तर आपण आवळ्याचे दैनंदिन सेवन करावे. यावर आपल्याला फायदा होईल व आपण कुठल्याही पद्धतीने खाऊ शकता. लोणचे मुरब्बा, ज्यूस किंवा इतर प्रकारे आवळा खाऊन प्रतिकार शक्ती वाढवू शकता.
2) केस व त्वचा : जर आपल्याला केस गळती किंवा त्वचेची समस्या असेल तर आपण आवळ्याचे नियमित सेवन करावे. यामुळे आपले ब्लड सर्कुलेशन चांगले राहते आणि आपली केसांची निगा चांगल्या प्रकारे होते. तसेच आपल्या त्वचे संबंधित समस्या असल्यास आवळा पूड आणि मधाचे एकत्रित सेवन करावे. यामुळे आपल्याला त्याची समस्या राहणार नाही आणि आपली त्वचा तजेलदार दिसेल.
3) मधुमेह : ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे अशा लोकांनी आवळ्याचे सेवन हे नियमितपणे केले पाहिजे. आवळ्यामध्ये क्रोमियम असते. तसेच त्यामुळे इन्शुलिन वाढीस लागते. यामुळे आपली मधुमेहाची समस्या ही काही प्रमाणात नक्की कमी होऊ शकते.
4) पचन क्रिया : बाहेरचे खाणे आणि कुठल्याही वेळी खाणे यामुळे अनेकांना पोटाची समस्या निर्माण होते.यावर लोक अनेक उपचार करतात. मात्र, त्यांना काहीही फरक पडत नाही. मात्र, आपण आवळ्याचे दैनंदिन जीवनामध्ये सेवन केल्यास आपल्याला पचन क्रियेचा त्रास दूर होतो. आवळ्यामध्ये गॅस्ट्रो असे गुणधर्म असतात. त्यामुळे आवळा पचन क्रिया ठीक होते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.