‘KGF’ चित्रपटातल्या अभिनेत्याचा भीषण अपघात, ट्रकने दिली धडक, मरता मरता वाचला

‘KGF’ चित्रपटातल्या अभिनेत्याचा भीषण अपघात, ट्रकने दिली धडक, मरता मरता वाचला

सध्या रस्ते अपघातामध्ये अनेकांना बळी पडावे लागते. यामध्ये गेल्या काही वर्षात अनेक अभिनेत्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही वर्षांपूर्वी आनंद अभ्यंकर यांचा देखील रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीवर एकच शोककळा पसरली होती.

आता देखील एका दिग्गज अभिनेत्याचा कार अपघात झाला आहे. सुदैवाने या कार अपघातात त्याला दुखापत झाली नाही, असे सांगण्यात येत आहे. केजीएफ चाप्टर १ आणि केजीएफ चाप्टर 2 या दोन्ही सुपरहिट चित्रपटांमध्ये अतिशय जबरदस्त अशी भूमिका करणारे अभिनेते बी एस अविनाश यांचा नुकताच एक अपघात झाला आहे.

बंगळुरू मध्ये अनिल कुंबळे सर्कल जवळ त्यांच्या आलिशान मर्सडीज ला एका ट्रकने जोरात धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की, गाडीच्या काही भागाचा चुराडा झाला. मात्र, सुदैवाने यामध्ये अविनाश यांना काहीही दुखापत झाली नाही. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ते प्रवास करत होते.

त्याच वेळेस त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. अविनाश यांच्या गाडीला अपघात झाल्याचे दिसताच आजूबाजूच्या लोकांनी त्यांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर ते अभिनेते असल्याचे समजले.

यश याची मुख्य भूमिका असलेल्या केजीएफ चित्रपटात अविनाश यांनी अँड्र्यू ही भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. केजीएफ चाप्टर टू पेक्षाही पहिल्या भागामध्ये अविनाश यांनी अतिशय सरस असे काम केले. दुसऱ्या भागामध्ये त्यांना कामाची फार संधी मिळाली नाही. या चित्रपटामध्ये गुंडांचा बॉस अशी भूमिका त्यांनी केली आहे.

या चित्रपटातील अनेक गमतीशीर माहिती समोर आली आहे. दिवंगत अभिनेते चिरंजीवी सर्जा यांच्यामुळे अविनाश यांना केजीएफ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. चिरंजीवी यांच्या संपर्कातूनच त्यांना ही भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी संधीचे सोने केले. 2015 पासूनच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते.

एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, या चित्रपटानंतर अनेक चित्रपटाच्या ऑफर देखील खूप मोठ्या प्रमाणात मिळाल्या. चाप्टर 2 या चित्रपटाला चांगले बॉक्स ऑफिसवर यश मिळाले. या चित्रपटात संजय दत्त याने खलनायकाची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात रविना टंडन भूमिका हिनेही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने जवळपास 1200 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अविनाश यांच्या भूमिकेने अनेकांचे लक्ष वेधले होते. याच प्रकारच्या भूमिका यापुढेही करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Team Hou De Viral