चित्रपटात बाप-लेकासोबत रोमांस करून बसल्या आहेत या 5 अभिनेत्री, माधुरी दीक्षित ने तर दिला आहे बोल्ड सीन

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की, जेथे मुलगा बाप एका चित्रपटात दिसू शकतात, तर मुलगी आणि आई देखील एका चित्रपटात दिसू शकतात. उदाहरण द्यायचे झाले तर धर्मेंद्र यांचे घ्यावे लागेल. धर्मेंद्र यांनी मुलगा बॉबी देवल आणि सनी देवल यांच्यासोबत देखील काम केले आहे.
काही वर्षापूर्वी अपने नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात तिघांनी एकत्र काम केले होते. आम्ही आपल्याला आज अशा अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत की ज्यांनी बाप आणि मुलासोबत काम केले होते. चला तर मग जाणून घेऊया. कोण आहेत त्या..
1) धर्मेंद्र, सनी देओल, श्रीदेवी : श्रीदेवी या बॉलीवूड च्या पहिल्या सुपरस्टार असून तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. श्रीदेवी हिने बाप आणि मुलासोबत काम केले आहे. धर्मेंद्र यांच्यासोबत श्रीदेवी यांनी नाकाबंदी या चित्रपटात काम केले आहे. तर सनी यांच्यासोबत चालबाज, निगाहे, रामावतार या चित्रपटात काम केले आहे.
2) अमृता सिंह, धर्मेंद्र, सनी देओल : अमृता सिंह यांनी सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्यासोबत देखील काम केले आहे. अमृता सिंह यांनी सनी यांच्यासोबत बेताब या चित्रपटात काम केले आहे. तर धर्मेंद्र यांच्यासोबत सच्चाई या चित्रपटात काम केले आहे. दोन्ही चित्रपट त्याकाळी हिट ठरले होते.
3) विनोद खन्ना, अक्षय खन्ना, डिम्पल कपाडिया : विनोद खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत काही चित्रपटात काम केले आहे. तर डिंपल कपाडिया यांनी अक्षय खन्ना एक सोबत आमिर खानचा दिल चाहता है या चित्रपटात काम केले आहे. चित्रपट फरान अख्तर यांनी दिग्दर्शित केला होता.
4) हेमा मालिनी, राज कपूर, रणधीर कपूर : हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी अनेक अभिनेत्यांसोबत देखील काम केले आहे. हेमामालिनी यांनी राज कपूर यांच्यासोबत सपनों का सौदागर या चित्रपटात काम केले होते. रणधीर कपूर यांच्यासोबत हाथ की सफाई या चित्रपटात काम केले होते. दोन्ही चित्रपट चांगले चालले होते.
5) माधुरी दीक्षित, विनोद खन्ना, अक्षय खन्ना : माधुरी दीक्षित हिने खूप चित्रपटात काम केले आहे. दयावान या चित्रपटात विनोद खन्ना यांच्यासोबत माधुरी दीक्षित हिने काम करून चार चांद लावले होते. या चित्रपटात दोघांचा हॉट सीन खूप गाजला होता. त्यानंतर अक्षय खन्ना याच्यासोबत माधुरी दीक्षित हिने मोहब्बते या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट चालला होता.