या अभिनेत्याला डॉक्टरांनी केले होते ‘मृत’ घोषित.. परंतु अचानक…

या अभिनेत्याला डॉक्टरांनी केले होते ‘मृत’ घोषित.. परंतु अचानक…

काही वर्षांपूर्वी आपण झी मराठी म्हणजेच पूर्वीची अल्फा मराठी या वाहिनीवर एक मालिका पाहिली असेल. या मालिकेचे नाव आभाळ माया असे होते. या मालिकेत सुकन्या मोने कुलकर्णी यांनी दर्जेदार काम करून सगळ्यांना मोहून टाकले होते. सुकन्या कुलकर्णी यांचे लग्न संजय मोने यांच्या सोबत झालेले आहे.

त्यामुळे सुकन्या मोने असे नाव आता आपल्या समोर लावत असतात. आभाळमाया या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी देखील भूमिका साकारली होती. त्यावेळी ही मालिका प्रचंड चालली होती. त्यानंतर मराठी मध्ये खऱ्या अर्थाने मालिका बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला, असे म्हणावे लागेल. त्यानंतर मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीने अवंतिका ही मालिका केली.

ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. यामध्ये संदीप कुलकर्णी यांनी भूमिका साकारली होती. ही मालिकाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर मृणाल कुलकर्णी यांनी अनेक मालिका व चित्रपटात काम केले. त्यानंतर मधुरा वेलणकर हिची मधुरा ही मालिका देखील झी मराठीवरच प्रचंड हिट झाली होती.

या मालिकेत प्रसाद ओक याने भूमिका साकारली होती. आभाळमाया मालिकेचे दिग्दर्शन हे विनय आपटे यांनी केले होते. विनय आपटे हे मराठीतील ख्यातनाम दिग्दर्शक अभिनेते होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मालिकेचे चित्रीकरण सुरू असतानाच निधन झाले होते.तर सुकन्या कुलकर्णी यांचे पती संजय मोने हे आहेत.

संजय मोने हे अतिशय हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. संजय यांनी आजवर खुलता कळी खुलेना, माझिया प्रियाला प्रीत कळेना, अवघाची संसार, आभाळमाया, कानाला खडा, दे धमाल यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

त्याचबरोबर ध्यास पर्व, पक पक पकाक, कायद्याचं बोला, मातीच्या चुली, साडे माडे तीन, इट्स ब्रेकिंग न्यूज, रक्त चरित्र, टाईम बरा वाईट, क्लासमेंट, मुंबई टाईम, बारायण, धागेदोरे, रिंगा रिंगा अशाच एका बोटावर, सत्या यासह इतर चित्रपटात त्यांच्या लोकप्रिय भूमिका आहेत. त्याचप्रमाणे ते संवाद लेखन देखील करतात. त्यांनी संवाद लेखन केलेले अनेक नाटक देखील खूप गाजले.

नाटकांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. बस स्टॉप, पावसाळी दिवस यासारख्या नाटकात मधील त्याच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. आता संजय मोने यांनी त्यांच्या बाबतीत घडलेला एक अनुभव नुकताच शेअर केला आहे. या अनुभवाबाबत बोलताना संजय मोने म्हणतात की, ज्यावेळेस माझी आई गरोदर होती आणि माझा जन्म व्हायचा होता, त्यावेळेस काहीतरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली होती आणि डॉक्टरांनी माझ्या आजोबांना सांगितले होते की, बाळाला वाचवावे लागेल किंवा आईला वाचवायला लागेल.

त्यावेळेस माझ्या आजोबांनी डॉक्टरांना सांगितले की, केवळ आमच्या सुनबाईला वाचवा. मात्र, सुदैवाने मी पण वाचलो आणि माझी आई पण वाचली. त्यानंतर माझे वडील हे नागपूर हून परत आले. त्यानंतर माझ्या वडिलांनी आजोबा सोबत चर्चा केली. माझे वडील देखील नाटकात काम करायचे. मला त्यानंतर त्यांनी नाटकातील भूमिका सोडून दिल्या. पुढे चालून मी हा त्यांचा वारसा जपला, असे ते म्हणाले.

Team Hou De Viral