‘या’ व्यक्तींसाठी बदाम खाणं ठरू शकत घातक

तुम्हीही ऐकलं असेल की स्मरणशक्ती तेज होण्यासाठी रोज बदाम खाल्ले पाहिजे, असे म्हंटले जाते. तुम्हाला बालपणी तुमची आई देखील रोज बदाम खायला देत असेल. स्वस्थ राहण्यासाठी रोज बदामाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कारण बदामात प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आरोग्याबरोबरच बदाम खाणे सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते. त्वचा आणि केसांसाठी बदाम खाणे उपयुक्त ठरते, परंतु काही लोकांसाठी बदाम खाणे नुकसानकारक ठरू शकते. पाहू बदाम खाणे केव्हा टाळावे.
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बदामाचे सेवन टाळावे.कारण रक्तदाबाचा त्रास असणारे लोक नियमित औषधे घेत असतात.अशावेळी बदाम ही समस्या अधिक वाढवेल.
मूतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या असल्यास वा पित्ताशया संबंधित काही त्रास असल्यास बदामाचे सेवन करणे टाळा. कारण त्यात ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते.
पचनासंबंधित काही समस्या असल्यास बदाम खाऊ नका. बदामात फायबर्स अधिक प्रमाण असल्याने समस्या वाढतील. अॅसिडीटीची समस्या असल्यास बदाम खाणे टाळलेलेच बरे.
बदामात कॅलरीज आणि फॅट्स असल्याने स्थूलतेची समस्या असलेल्यांनी बदाम खाऊ नयेत.
आरोग्याच्या कोणत्याही समस्येवर अँटीबायोटीक मेडिसीन घेत असल्यास बदाम खाणे बंद करा.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.