अडुळशाच्या पानांचा वापर करून पळवा अनेक आजारांना दूर… हे करा उपाय..

सध्या पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. हिवाळ्यात आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. यामध्ये प्रामुख्याने सर्दी-खोकला हा मोठ्या प्रमाणात होत असतो. सर्दी खोकल्यावर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घेत असतो. मात्र, असे महागडी औषधे घेऊन आपल्या शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते.
यापेक्षा आपण घरगुती उपाय करून यावर मात करू शकतो. तसेच आयुर्वेदिक उपचार करून देखील आपण या आजार पासून कायमची सुटका करू शकतात. आम्ही आपल्याला आज अडुळसा पानाबद्दल माहिती घेणार आहोत.अडुळशाच्या पानामध्ये मोठे आयुर्वेदिक गुणधर्म भरलेले असतात. त्यामुळे याचा वापर वेगवेगळ्या आजारावर होऊ शकतो.
1) सर्दी खोकला : जर आपल्याला सर्दी खोकला झाला असेल तर आपण अँटिबायोटिक औषधे घेण्यापेक्षा आयुर्वेदिक उपचार करावेत. अडुळसाचे 5 ते 6 पान खावे. त्यामुळे आपला सर्दी खोकला थांबतो. तसेच मेडिकलमध्ये अडुळसा सिरप देखील भेटते, हेदेखील आपण वापरू शकता.
2) अल्सर : जर आपल्याला पित्ताचा त्रास होत असेल तर आपण अडुळशाची पाने खाल्ली पाहिजेत. तसेच अल्सरचा त्रास देखील यामुळे कमी होऊ शकतो. नियमितपणे अडुळशाचे पाने कुठून खावीत यामुळे अल्सरचा त्रास हा काही प्रमाणात नक्कीच कमी होतो.
3) ठणक : आपल्याला एखादे जुने दुखणे असेल आणि वारंवार आपला हात किंवा पाय एका ठिकाणी दुखत असेल तर आपण त्या ठिकाणी अडुळशाचे पानांची पेस्ट करून लावावी. ही ठणक थांबण्यास नक्कीच मदत होते.
4) श्वसन : श्वसन किंवा अस्थमाचा त्रास होत असेल तर आपण नियमितपणे अडुळशाची पाने ही खाल्ले पाहिजे. त्यामुळे आपल्याला श्वसन चे विकार कमी करता येऊ शकतात. मात्र, आपण आठवड्यातून काही दिवस सेवन तर नक्कीच केले पाहिजे. अस्थमाच्या पेशंटला देखील याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
5) डोकेदुखी : जर आपल्याला डोकेदुखीचा त्रास असेल तर आपण अडुळशाचे पान तोडून चावून खावीत. यामुळे आपला डोकेदुखीचा त्रास कमी होतो. हा प्रयोग आपल्याला आठवड्यातून काही दिवस करावा लागेल. यामुळे आपल्याला नक्कीच फरक पडतो.
6) जखम : जर आपल्याला एखादी जखम झाली असेल तर आपण अडुळशाची पाने तोडून ज्या ठिकाणी जखम झाली आहे त्या ठिकाणी लावावी. त्यामुळे आपली जखम भरून निघण्यास नक्की मदत होते. अडुळशाच्या पानात मोठे आयुर्वेदिक गुणधर्म भरलेले असतात. त्यामुळे याचा वापर आपण जखमेवर करू शकतो आणि अनेक आजारावर मात करू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.