Video ! जेव्हा बाळुमामांच्या जत्रेत होती मालिकेतील बाळुमामांची एन्ट्री, पहा पुढे काय घडले

Video ! जेव्हा बाळुमामांच्या जत्रेत होती मालिकेतील बाळुमामांची एन्ट्री, पहा पुढे काय घडले

हल्ली कुठली मालिका लोकप्रिय झाली किंवा मालिका लोकप्रिय करायची असल्यास किंवा एखादा चित्रपट हिट करायचा असल्यास त्या मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना त्याचे प्रमोशन करणे हे फार गरजेचे असते.

हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये हा ट्रेण्ड गेल्या अनेक वर्षापासून आहे. मात्र, आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील हा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात रुळला आहे, तर या मालिकांमध्ये देखील असा ट्रेंड पाहायला मिळत आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत काम करणारा अभिनेता बाळूमामाच्या यात्रेत पोहोचल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे.

14 फेब्रुवारी 2022 पासून या मालिकेची वेळ बदलण्यात आलेली आहे. आता ही मालिका पुन्हा एकदा साडेसात वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येते, तर गेल्या काही झालेल्या भागांमध्ये आपण बाळूमामा हे सत्यवाला बोलताना दिसत आहेत. मी तुला आजवर काहीही देऊ शकलो नाही. एक दागिना ही केला नाही.

त्यावर सत्यवा म्हणते की, तुम्हीच माझे खरे दागिने आहात. त्यामुळे या मालिकेत आता या दोघांची पुन्हा एकदा भेट झाल्याचे आपण पाहिले आहे. ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. बाळूमामाच्या भूमिकेमध्ये आपल्याला लहानपणीच्या भूमिकेत अभिनेता समर्थ पाटील दिसला होता, तर मोठा बाळूमामा हा सुमित पुसावळे यांनी साकारला आहे.

सुमित पुसावळे हा अतिशय जबरदस्त असा अभिनेता आहे. त्याचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या एका खेडेगावात झाला, तर त्याचे प्राथमिक शिक्षण हे सांगली जिल्ह्यातील झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये गेला होता. मात्र, अभिनयाची आवड असल्याने त्याने या क्षेत्रात पदार्पण केले.

आता बाळूमामाचे वयस्कर रूप देखील मालिकेत दाखवण्यात येत आहे. बाळूमामा हे लोकांच्या नावानं चांगभलं म्हणून त्यांचे भले करताना दिसत असतात. या मालिकेमध्ये अंकिता पनवेलकर हिनेदेखील भूमिका साकारली आहे, तर मालिकेत अक्षय टाकने त्याची भूमिका साकारली आहे.

रोहित देशमुख यांनी या मालिकेत मायप्पा हे पात्र अतिशय छान रीतीने साकारले आहे, तर कोमल मोरे ही ने तरुण पणीच सत्यवा साकारली आहे. तर पाच बाई च्या भूमिकेत आपल्याला मीनाक्षी राठोड येथील दिसली आहे. तर आता नुकतीच एक यात्रा भरवण्यात आली होती. ही यात्रा बाळूमामाच्या मंदिराच्या शेजारीच भरवण्यात आली होती.

या यात्रेमध्ये अभिनेता सुमित हा पोहोचला होता. या वेळेस त्याने जमलेल्या नागरिकांशी संवाद देखील साधला आणि मालिकेतील काही डायलॉग देखील बोलून दाखवली. त्यामुळे नागरिक हे जाम खुश झाले. त्यानंतर त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या वेळेस प्रचंड गर्दी होती आणि सगळ्यांनी सुमित याच्या नावाचा जय जय कार या वेळेस केला.

Team Hou De Viral