बॉलिवूड दुःखात ! या प्रसिद्ध कलाकाराचे कोमातून बाहेर आल्यावर झाला मृत्यू

बॉलिवूड दुःखात ! या प्रसिद्ध कलाकाराचे कोमातून बाहेर आल्यावर झाला मृत्यू

बॉलीवूडमध्ये एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. अनेक कलाकारांची निधन गेल्या काही महिन्यांमध्ये झाले आहे, तर गेल्या काही वर्षात बॉलिवूडमधून अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. आता देखील बॉलीवूड तसेच पंजाबी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अफलातून गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या एका ज्येष्ठ गायकाचे निधन झाले आहे.

गेल्या महिन्याच्या सुमारास कोलकाता येथे बॉलीवूडचे दिग्गज गायक केके यांचे एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यानच निधन झाले होते. लाईव्ह कार्यक्रम करताना त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यानंतर त्यांची रुग्णालयामध्ये प्राणज्योत मालवली. या हॉलमध्ये श्वास घेण्यास त्यांना त्रास देत होता. मात्र, असे असूनही त्यांना तशा परिस्थितीत गाणी म्हणायला भाग पाडण्यात आले आणि त्यांचे त्यातच निधन झाले.

काही दिवसापूर्वी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच बॉलीवूड मधून देखील या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. कारण की सिद्धू मुसेवाला हा प्रसिद्ध गायक होता. त्याचप्रमाणे त्यांनी राजकारणात देखील मोठी झेप घेतली होती.

आता देखील पंजाबी चित्रपटसृष्टी मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण की एका पंजाबी गायकाचे निधन झाले आहे. या गायकाचे नाव बलविंदर सफारी असे होते. बलविंदर सफारी यांनी वयाच्या 63 व्या वर्षी आकारचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील याला दुजोरा दिला आहे.

पंजाबमध्ये जन्मलेले बलविंदर सफारी यांना भांगडा स्टार म्हणून ओळखले जात होते. 1990 मध्ये त्यांनी बॉईज बँडची स्थापना केली होती. बलविंदर सफारी यांनी आपल्या गाण्यांनी लोकांच्या मनामध्ये विशेष असे स्थान निर्माण केले होते. पाव भांगडा, चंद मेरे मखना, यार लंगडे यासारख्या पंजाबी गाण्यांनी त्यांनी लोकांची मने जिंकली.

ते पंजाबी लोकांच्या मनामध्ये अगदी घर करून बसले होते. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यादरम्यानच त्यांच्या निधनाची अफवा देखील समोर आली होती. मात्र, तेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती. आता मात्र त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पंजाबी गायक आणि तेथील चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे, तर दुसरीकडे बॉलीवूड मधून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

बलविंदर यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर मेंदूमध्ये त्यांच्या मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याचे दिसून आले. 86 दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येते होते. नंतर त्यांना रुग्णालयातून आल्यानंतर ते कोमात गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Team Hou De Viral