‘गद्दारांना ठेचा’, अरे ही काय भाषा, ‘बिगबॉस मराठी’ चा नवीन प्रोमो पाहून सगळीकडे उडाली खळबळ

कलर्स मराठीवर सुरू झालेला बिग बॉस हा शो आता खऱ्या अर्थाने रंगत भरत असल्याचे समोर येत आहे. कारण की या शो मध्ये आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. या शोमध्ये आता अनेक कलाकार हे आपल्या मधले असलेले कलागुण देखील दाखवताना दिसत आहेत.
बिग बॉस मध्ये एक्स्ट्रा मसाला नावाचा एक ऑप्शन देखील दाखवण्यात येतो. यामध्ये अनेक कलाकार हे वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करताना देखील दिसत असतात. अलीकडेच झालेल्या एका चर्चेदरम्यान अमृत देशमुख ही ढसाढसा रडायला लागली होती. किरण माने यांच्या खांद्यावर डोके ठेवून ती रडायला लागली होती आणि ती सांगत होती की, मी अशीच आहे मी तशीच आहे.
त्यावर किरण माने तिला म्हणत होते चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतेस. त्याचबरोबर किरण माने यांनी विकास सावंत याला देखील धीर देऊन तू चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतो, असे म्हटले होते. तर अलीकडे झालेल्या भागामध्ये बिग बॉस सारखाच महेश मांजरेकर यांनी चावडीवर सहभागी झालेल्या सगळ्याच स्पर्धकांना चांगली झापून काढले होते.
अमृता देशमुख हिला तू वकील असल्यासारखी वागू नकोस, असे म्हटले तर प्रसाद जवादे याला देखील महेश मांजरेकर यांनी चांगले झापले होते. एकूणच काय तर बिग बॉसच्या घरामध्ये आता रंगत वाढत चालण्याचे दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अमृता देशमुख, समृद्धी जाधव, रुचिरा जाधव, रोहित शिंदे, प्रसाद जवादे, निखिल राज शिर्के, किरण माने यांच्यासह इतर स्पर्धक देखील सहभागी झाले आहेत.
या स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देखील देण्यात येतात. या टास्कदरम्यान हे खेळाडू आपला खेळ देखील दाखवतात. बिग बॉस हा शो ज्यावेळेस सुरू झाला, त्यावेळेस या शोमध्ये रोहित शिंदे, रुचिरा जाधव यांच्या मधला एक व्हिडिओ व्हयरल झाला होता. हा व्हिडिओ अतिशय भयंकर होता. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीका देखील केली होती.
आता बिग बॉसच्या घरामध्ये चावडीमध्ये महेश मांजरेकर यांनी सर्व स्पर्धकांना एक टास्क देऊन सांगितले की, तुम्हाला जे आवडत नाही, अशा गद्दारांना उखळीमध्ये घालून ठेचा आणि सगळ्यांचे फोटो असलेले मातीचे गोल आकाराच्या वस्तू तिथे ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू घेऊन आपल्याला न आवडणारे कलाकारांना उकळीत घालून हे कलाकार ठेचताना दिसत आहेत.
अमृता देशमुख मला आवडत नाही तिला मी ठेचत आहे, असे एक जण म्हणत आहे, तर इतर स्पर्धक म्हणत आहे की, मला न आवडणाऱ्या सगळ्यांना मी कुटत आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या शोमध्ये वेगळे वळण येणार आहे.