‘मला चावला तर दात च पाडेल’, प्रसाद आणि अक्षय मध्ये मोठे भांडण

‘मला चावला तर दात च पाडेल’, प्रसाद आणि अक्षय मध्ये मोठे भांडण

गेल्या काही वर्षांमध्ये हिंदीत बिग बॉस हा रियालिटी शो हिंदीमध्ये धुमाकूळ घालताना दिसतात. या रिॲलिटी शोचे सलमान खान हा सूत्रसंचालन करत असतो. मुळात ही संकल्पना पाश्‍चात्त्य देशांतून आलेली आहे. पाश्चात्य देशांमध्ये अशा प्रकारचे शो खूप मोठ्या प्रमाणात सुरु असतात.

त्या नंतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील असेच शो सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. बिग बॉस मराठी हा शो देखील आता गेल्या काही वर्षापासून आपल्याकडे सुरू झालेला आहे. आता बिग बॉस मराठी 4 शो देखील सुरू झाला आहे. या मालिकेचे होस्ट महेश मांजरेकर हे प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक करत असतात.

महेश मांजरेकर यांच्यावर नुकतीच एक गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचे वजन देखील प्रचंड घटलेले आहे. त्यांना कर्करोगाने ग्रासले होते, असे सांगण्यात येत आहे. यानंतर त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यामुळे ते अतिशय खालावलेले दिसत होते. तसेच महेश मांजरेकर यांनी मराठी बिग बॉस चा व्हिडिओ देखील आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला होता.

बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये मध्ये अमृता देशमुख, प्रसाद जवादे, निखिल राज शिर्के, किरण माने, विकास पाटील, तेजस्वी लोणारे, अक्षय, समृद्धी जाधव यांच्यासह अनेक कलाकार हे सहभागी झालेले आहे, तर बिग बॉसच्या या घरामध्ये आता प्रचंड भांडणे होताना दिसत आहेत.

नुकताच झालेल्या एका टास्कमध्ये अनेक कलाकारांचे जोरदार भांडण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. बॅग घेण्याची स्पर्धा लागली असताना हे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले, तर गेल्या काही भागांमध्ये अमृता देशमुख ही प्रचंड रडल्याचे देखील पाहायला मिळाली. किरण माने यांनी तिला खूप समजावून सांगितले, त्यानंतर ती शांत झाली.

आता नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये प्रसाद जवादे आणि अक्षय यांच्यामध्ये प्रचंड वाद झाल्याचे पाहायला मिळाले. प्रसाद जवादे आणि अक्षय हे जोरजोरात भांडतांना दिसत आहेत. प्रसाद हा अक्षयला म्हणत आहे तू मला चावला, तर मी तुझे दातच पाडेल. मला काही कमी समजले का? असे म्हणत आहे, तर इतर स्पर्धक हे या दोघांनाही समजून सांगताना दिसत आहेत.

त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये आता हा वाद किती वाढतो, हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे.

Team Hou De Viral