‘बिगबॉस’ च्या घरात तुफान राडा ! प्रसाद जवादे आणि निखिल मध्ये हाणामारीपर्यंत पोहोचले प्रकरण

‘बिगबॉस’ च्या घरात तुफान राडा ! प्रसाद जवादे आणि निखिल मध्ये हाणामारीपर्यंत पोहोचले प्रकरण

कलर्स मराठी वर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस या शोमध्ये आता रंगत चढत चालली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण आता एकामागून एक घरामध्ये जोरदार भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता देखील दोन कलाकारांमध्ये प्रचंड भांडण झाल्याचे दिसत आहे.

त्यामुळे आता बिग बॉस म्हणजे अर्थात महेश मांजरेकर हे काय निर्णय घेतात याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. 2 ऑक्टोबरपासून कलर्स मराठी या वाहिनीवर बिग बॉस या शोच्या चौथ्या सत्राला सुरुवात झाली आहे. गेले तीन सत्र अनेक कलाकारांनी आपल्या खेळाने गाजवले होते बिग बॉसच्या तिसऱ्या सत्रामध्ये विशाल निकम याने बाजी मारली.

तिसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने मजा आली असे म्हणावे लागेल. कारण तिसऱ्या पर्वामध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्या तुलनेत चौथ्या पर्वामध्ये एवढे खास सेलिब्रिटी सहभागी झाले नाहीत, असेच म्हणावे लागेल. आता चौथ्या सत्रामध्ये प्रसाद जवादे, किरण माने ,अमृता देशमुख, निखिल राज शिर्के, विकास पाटील, तेजस्विनी लोणारे, समृद्धी जाधव यांच्यासह इतर कलाकार सहभागी झाले आहेत.

मात्र या सगळ्यामध्ये सध्यातरी प्रसाद जावदे हा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा शो सुरू झाला त्याच दिवशी प्रसाद आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात वाद झाला. अपूर्वा हिने अतिशय आक्रमक पणे प्रसाद याच्यावर हल्ला केला होता आणि त्यानंतर त्याला शिवीगाळ देखील केली होती. त्यानंतर प्रसाद याने ही आक्रमकपणे त्याला उत्तर दिले होते.

त्याचबरोबर बिग बॉसच्या घरामध्ये किरण माने यांनीही विकास पाटील याचे कान भरले होते. विकास पाटील याला काहीजण शोमध्ये त्रास देत होते. त्यामुळे किरण माने यांनी विकास याला तू पण आता काही ऐकू नको, असे म्हणून सांगितले होते, तर आता बिग बॉस मधला एक प्रोमो सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.

या प्रोमो मध्ये प्रसाद जवादे याचा प्रचंड वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. समोर त्याच्या निखिल राज शिर्के आणि इतर कलाकार देखील दिसत आहेत. यावेळेस प्रसाद हा जोरजोरात ओरडताना दिसत आहे. माझ्यामध्ये हिम्मत आहे तुला माहिती आहे, असे म्हणत आहे, तर तिकडून देखील आवाज येत आहेत तुझ्यात किती हिम्मत आहे, आम्हाला माहित आहे, तू दाखवून दे, असे म्हणत आहे.

त्यामुळे बिग बॉसच्या आजच्या रात्रीच्या भागात नेमके काय होणार, कोण घराच्या बाहेर पडणार हे आपल्याला समजणार आहे, तर दुसरीकडे निखिल राज शिर्के आणि अमृता देशमुख या दोघांचे नॉमिनेशन होईल, असे देखील बोलले जात आहे.

Team Hou De Viral