बिगबॉस मराठी 4 च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, हा स्पर्धक जाणार घराबाहेर

बिगबॉस मराठी 4 च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, हा स्पर्धक जाणार घराबाहेर

कलर्स मराठी या वाहिनीवर दोन ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या बिग बॉस ने आता रंगत घेतली आहे. गेल्या काही दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये जोरदार हाणामाऱ्या, भांडणं होत असल्याचे आपण पाहत आहोत. या शोमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना आपणच बिग बॉस होणार असे वाटायला लागले आहे.

मात्र, यामध्ये जो कोणी चांगला खेळ करेल, तो आपल्याला बिग बॉस झाल्याचे पाहायला मिळणार आहे, तर बिग बॉस या चारचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करत आहेत. गेल्या तीन सत्रा मध्ये महेश मांजरेकर यांनीच या शोचे सूत्रसंचालन केले आहे. आता चौथ्या पर्वा मध्ये देखील महेश मांजरेकर हेच या शोचे सूत्रसंचालन करत असून.

आपल्या जबरदस्त अशा शैलीने ते सहभागी झालेल्या स्पर्धकांचे मन जिंकून घेत आहेत. त्याचप्रमाणे प्रेक्षकांचेही ते मन जिंकत आहेत. आता बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन होणार असल्याचे कळत आहे. यामध्ये काही स्पर्धकांची नावे देखील समोर आले आहेत.

मराठी बिग बॉस मध्ये या आठवड्यात आपण अमृता देशमुख, निखिल राजशिर्के अमृता धोंगडे, रोहित शिंदे, विकास सावंत, रुचिरा जाधव, योगेश जाधव आणि अक्षय केळकर नॉमिनेट झाले आहेत. हे जे कलाकार नॉमिनेट झालेले आहेत, या कलाकारांना मतदान करून आपण वाचवायचे असते. ज्याला जास्त मतदान मिळेल, तो कलाकार या शोमध्ये राहील आणि कमी मतदान त्याला पडेल तो शोच्या बाहेर जाईल, असा या स्पर्धेचा नियम असतो.

आता आलेल्या मतदानानुसार रोहित शिंदे हा कलाकार सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शिंदे याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच यादीमध्ये अक्षय केळकर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे अभिनेत्री अमृता देशमुख आहे. चौथ्या क्रमांकावर आहे निखिल राज शिर्के. पाचव्या क्रमांकावर आहे अमृता धोंडगे, सहाव्या क्रमांकावर आहे रुचिरा जाधव.

तर सातव्या क्रमांकावर विकास सावंत आणि योगेश जाधव यांची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विकास सावंत किंवा योगेश जाधव यांच्यापैकी एक जण या शोच्या बाहेर जाणार आहे, आता आपल्याला लवकरच कळणार आहे की, कोण या शोच्या बाहेर जातो, तर कलर्स मराठी वरील बिग बॉस हा शो आपण पाहतात का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral