नुसती मुखशुद्धी नव्हे, बडीशेप खाण्याचे हेही आहेत 10 जबरदस्त फायदे

नुसती मुखशुद्धी नव्हे, बडीशेप खाण्याचे हेही आहेत 10 जबरदस्त फायदे

भारतीय अन्नपदार्थांमध्ये बडीशेपला महत्त्व आहे. मुखशुद्धी म्हणून बडीशेप खाल्ली जाते. पण केवळ तेवढाच त्याचा उपयोग नाही. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो.

बडीशेप अपचन दूर करते, पोटदुखी आणि श्वासासंबंधी आजारात औषध म्हणून वापरली जाते. जेवणानंतर किंवा हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर आपण बडीशेप आवर्जुन खातो. अनेक पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर केला जातो. दररोज बडीशेप खाल्ल्यानं काय फायदे होतात जाणून घेऊयात.

1.अजीर्ण, मळमळ होत असेल किंवा पचनाचा त्रास असेल त्यांनी नियमित जेवणानंतर बडीशेप खावी. त्यामुळे पचन होण्यात मदत होते आणि मळमळही थांबते.

2.खोकला झाला असेल तर बडीशेप आणि मध एकत्र करून घ्यावं. खोकला कमी होण्यास मदत होते.

3.रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप आणि साखर बारीक करून कोमट पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे बद्धकोष्ट आणि गॅसच्या त्रासापासून आराम मिळतो.

4.बडीशेप आणि पत्री खडीसाखर एकत्र करून खावी. डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

5.जेवल्यानंतर बडीशेप खाल्ली तर जेवण चांगलं पचतं. काळं मीठ, जीरे, बडीशेप एकत्र चूर्ण करून घेतल्यानं कोमट पाण्यासोबत घ्यावं. पचनक्रियेसाठी हे चूर्ण उत्तम आहे.

6.पोटात दुखत असेल तर भाजलेली बडीशेप खावी. उन्हामुळे जळजळ होत असेल तर सरबत किंवा बडीशेप भिजवलेलं पाणी प्यावं.

7.उलटीचा त्रास होत असेल तर बडीशोप खावी. तात्काळ आराम मिळतो.

8.नियमित सकाळी ग्लासभर बडीशेपाच्या पाण्यामध्ये मध मिसळून

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral