गुडघेदुखीपासून तोंड येण्याच्या समस्येवर रामबाण उपाय आहे ही औषधी वनस्पती, जाणून घ्या त्या वनस्पतीबद्दल

गुडघेदुखीपासून तोंड येण्याच्या समस्येवर रामबाण उपाय आहे ही औषधी वनस्पती, जाणून घ्या त्या वनस्पतीबद्दल

वाढत्या वयामुळे अनेकांना गुडघेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असतो. यामुळे अनेकजण डॉक्टरांचा सल्ला घेतात. तसेच आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातात. मात्र, महागडी औषधे घेऊन देखील गुडघेदुखीपासून त्यांना मुक्तता मिळत नाही. अशा लोकांनी आयुर्वेदिक उपचार केल्यास त्यांना फरक पडतो.

अडुळसा यावर रामबाण उपाय आहे. अडुळसाचे उपयोग वेगवेगळे आजारासाठी देखील करता येतात. यात तोंड येणे, दात दुखी, श्वसन संबंधी आजार यावरदेखील अडुळसा चा उपयोग होतो. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अडुळशाच्या संबंधित उपचार सांगणार आहोत. अडुळसा उपयोग करून आपण अनेक आजारावर मात करू शकता.

1) तोंड येणे : अडुळसा थंड प्रकृतीचा असतो. अडुळशाची फुले हे पांढरे असतात. अडुळशाच्या सेवनाने कफ, खोकला, ताप देखील कमी होते. मात्र, आपले जर तोंड आले असेल तर दोन-तीन पाने चावून चावून खावी त्यानंतर हे पाने फेकून द्यावे. असे केल्याने आपले तोंड येण्याची समस्या कमी होते. तसेच तोंडातील फोड कमी होतात.

2) दात, हिरड्या : आपल्याला दात दुखी समस्या असल्यास आपण उपचार करून देखील काही उपयोग होत नाही. मात्र, आपण अडुळशाचे पान खाऊन दात दुखी थांबवू शकता. तसेच आपल्या हिरड्या देखील यामुळे मजबूत होतात.

3) श्वसन : अनेकांना श्वसन संबंधी आजार मोठ्या प्रमाणात असतात. तसेच अस्थमाचा त्रास देखील अनेकांना होत असतो. अशा लोकांनी अडुळशाच्या काढायचे सेवन केल्यास श्वसन संबंधी आजारही दूर होतात.

4) मूत्रदोष :अनेकांना मुत्र दोषाची समस्या मोठ्या प्रमाणात असते. अशांना लघवीला जळजळ होत असते. अशा लोकांनी अडुळशाचे सेवन करावे. हे सेवन केल्याने मूत्रदोष कमी होते. दहा ग्राम खरबूज बिया, अडुळसा दहा ग्राम याचे मिश्रण करून घ्यावे. यामुळे मूत्र दोष कमी होतो.

5) गुडघा दुखी : अडुळसा मध्ये मोठे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. ज्यांना गुडघेदुखी ची समस्या आहे, अशा लोकांनी अडुळशाच्या काढा घ्यावा. ज्या ठिकाणी गुडघेदुखी आहे त्या ठिकाणी अडुळशाच्या पानाचे लेपण लावावे. यामुळे गुडगा दुखी कमी होते.

6) मासिक पाळी : मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या मासिक पाळीत होणाऱ्या अनियमितता दूर करण्यासाठी अडूळसा देखील वापरतात. अडुळसाची 10 ग्रॅम पाने, 6 ग्रॅम मुळा आणि गाजरचे बि अर्धा लिटर पाण्यात उकळा आणि जेव्हा हे पाणी एक चतुर्थांश शिल्लक राहिल, तेव्हा हा काढा पिल्यास मासिक पाळीच्या समस्येस बरे होईल. त्याचबरोबर जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्याही दूर होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral