लग्नानंतर काही दिवसांमध्ये मामीचं भाच्याशी जमलं, दोघांनी घेतला असा निर्णय, ते जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

लग्नानंतर काही दिवसांमध्ये मामीचं भाच्याशी जमलं, दोघांनी घेतला असा निर्णय, ते जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

एखादी व्यक्ती प्रेमात पडली की त्याला चांगलं आणि वाईटमधील फरक कळत नाही. प्रेमात आंधळे झालेल्या व्यक्ती अनेकदा नात्यांना देखील काळीमा फासतात. असाच एक प्रकार नवीन लग्न झालेली नवरी आणि तिच्या भाच्यामध्ये घडला आहे.

लग्नानंतर काही दिवसांनीच ही विवाहिता त्याच्या भाच्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने त्याच्याबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला. तिने फक्त हा निर्णय घेतला नाही, तर त्याची अंमलबजावणी देखील केली. मामी आणि भाचा यांची ही कृती सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

काय आहे प्रकरण?

बिहार (Bihar) मधील गोपालगंज जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात पीडित मामाने (uncle) त्याच्या भाच्यासह चार जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राकेश शर्मा असं या पीडित व्यक्तीचं नाव आहे. तो हरपूर गावचा रहिवासी आहे. राकेशचं 22 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटात लग्न झालं. नवं जोडपं त्यांच्या सुखी संसराची स्वप्न रंगवत होते.

त्याचवेळी लग्नानंतर आठवडाभरात नवरी मुलाच्या आयुष्यात तिच्या भाच्यानं प्रवेश केला.या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, राकेशचं हार्डवेअरचं दुकान आहे. राकेशच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा भाचा काही मित्रांसह मामीला भेटायला जात असे. याच भेटीमध्ये दोघांचं प्रेम जमलं आणि ते एके दिवशी फरार झाले. राकेशनं या प्रकरणात मंगळवारी मांझा येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

राकेशच्या तक्रारीनंतर भाच्यासह पाच जणांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली असून भाचा आणि त्याच्यासोबत पळून गेलेली त्याची मामी यांचा शोध सुरु आहे. हे संपूर्ण प्रकरण प्रेम संबंधातून घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी फरार व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे.

Team Hou De Viral