‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये कावेरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये कावेरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

एकांकिका या माध्यमामुळे मनोरंजनविश्वाला सातत्यानं नवनवीन चेहरे मिळाले आहेत. सिनेसृष्टीत स्थिरावलेल्या अनेकांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एकांकिकेपासूनच केली होती. अलीकडी एकांकिका करणारी कलाकार मंडळी अनेक मालिका आणि चित्रपटात कमालीची कामगिरी करताना दिसत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे भाग्या नायर.

एकांकिका ते युट्यूबर आणि आता मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली असून तिची लोकप्रियता वाढताना दिसतेय. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वात भाग्या अभिरामची बायको कावेरीची भूमिका साकारत आहे. तिचा रंगभूमीवरचा प्रवास कॉलेजपासून सुरू झाला. युथ फेस्टिव्हलमधील ‘मादी’ या एकांकिकेपासून तिनं आपल्या अभिनयाची सुरुवात केली.

युथ फेस्टिव्हल, इप्टा, आयएनटी अशा मानाच्या अनेक एकांकिका स्पर्धेत तिनं प्रेक्षक आणि परिक्षकांची मनं जिंकली. एकांकिका, नाटक करत असताना तिची ओळख सुमित चव्हाणशी झाली. सुमितच्या ‘इट्सच’ या युट्यूब चॅनलच्या सुरुवातीच्या काळात भाग्याबरोबर केलेल्या ‘स्कूल फ्रेंड क्रश’ आणि ‘कुछ मिठा हो जाये’ या युट्यूब वेब सीरिजनं चांगलाच प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद बघता दोघांनी इट्सच या चॅनलद्वारे अनेक मैलाचे दगड पार केले.

‘itsuch’ हे युट्युब चॅनेल त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनामधील वेब सीरीज आणि शॉर्ट व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्री भाग्या ही या कालाकारांच्या चमूमधील मुख्य कलाकार आहे. लहानपणापासूनच भाग्याला अभिनयाची आवड होती. तिने महाविद्यालयीन काळात अनेक एकांकिका स्पर्धांतून सहभागी होत, आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. तिचा सहभाग असलेल्या अनेक एकांकिकांनी स्पर्धांमध्ये पारितोषिकंही पटकावली आहेत.

‘सुंदरी’, ‘दादाची रक्षण सेना’, ‘उत्खनन’ या तिची भूमिका असलेल्या काही पारितोषिक विजेत्या नाट्यकृती. यापैकी ‘सुंदरी’ या नाटकातील तिच्या भूमिकेसाठी तिला अभिनयाचं पारितोषिकही मिळालं आहे. रंगभूमीवर वावरत असताना तिने नवमाध्यम असणाऱ्या वेब सीरीज आणि शॉर्ट फिल्म्स मध्येही काम करण्यास सुरुवात केली होती.

तिने ‘क्षणिक’ नावाच्या हिंदी शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. त्यात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती. तसेच itsuch च्या अनेक शॉर्ट फिल्म आणि व्हिडीओमध्येही तिने काम केले आहे.

उत्तम नृत्यांगनाही! – अभिनयासोबतच भाग्या ही उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतलेले आहे. तसेच, तिने अनेक ब्रँड्ससाठी मॉडेलिंग देखील केले आहे. महाविद्यालयीन जीवनात कलाक्षेत्रासोबतच भाग्या खेळातही अग्रेसर होती.

आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी भाग्या ही ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत दाखल होणं म्हणजे प्रेक्षकांसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्काच आहे. या मालिकेत भाग्या साकारात असलेली ‘कावेरी’ जर ‘अभिराम’ची पत्नी आहे, तर ‘देविका’ कुठे गेली असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्याच बरोबर मालिकेच्या नव्या प्रोमोत भाग्या चक्क शेवंताच्या रुपात दिसल्याने प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

अशातच भाग्या शॉर्ट फिल्म नाटक एकांकिका आणि मॉडेलिंग करत होती. तिच्या दाक्षिणात्य वळणाच्या मराठीच्या अनेक जण प्रेमात पडले आहेत. ‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये मूळची दाक्षिण्यात दाखवलेल्या कावेरीच्या भूमिकेतली भाग्य अनेकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral