मराठीतल्या ‘ह्या’ हॉट अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो पाहून चाहते अचंबित

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहे की, ज्या ग्लॅमरस अंदाजाने सगळ्यांचेच मन जिंकत असतात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे ही होय. भाग्यश्री ही आपले हॉट आणि मादक फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते.
तिच्या फोटोला लाखो लाईक्स देखील असतात. भाग्यश्री मोटे हिने गेल्या वर्षीच्या सुमारास आपल्या शरीरावर एक टॅटू गोंदवलेला होता. मात्र, तिचा हा टॅटू आता वादग्रस्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे. भाग्यश्री हिने आपल्या शरीरावर महामृत्युंजय जपाचा टॅटू काढला होता.
त्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल करून ‘तुला काही कळते का?, असे देखील सुनावले आहे. भाग्यश्रीने तिच्या कंबरेच्यावरच्या व ब्रेस्टच्या खालच्या भागामध्ये महामृत्युंजय मंत्राचा टॅटू गोंदवून घेतला होता. हा टॅटू पाहिल्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं होत. मात्र, टॅटू काढण्यासाठी तिने निवडलेली जागा पाहून काही नेटकऱ्यांनी, तिच्यावर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका केली आहे.
तसेच या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, असे देखील म्हटले आहे. भाग्यश्री मोटेने ‘काय रे रास्कला’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे देखील चर्चेत असते. भाग्यश्रीच्या खासगी आयुष्याची अनेकदा चर्चा झाली. पण तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल कधीच काही लपवले नाही.
काही महिन्यांपू्र्वी तिने आपण कोणासोबत रिलेशनशिप मध्ये आहोत याबाबत देखील माहिती दिली होती. प्रसिद्ध अभिनेता रितिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट असलेल्या विजय पलांडे याच्यासोबत भाग्यश्री मोटे ही रिलेशनशिप मध्ये आहे. याबाबत तिने माहिती देखील दिली होती. आता या दोघांनी नुकताच साखरपुडा उरकला आहे साखरपुड्याला अगदी काही लोक उपस्थित होते.
घरचे आणि काही नातेवाईक या साखरपुड्याला उपस्थित होते. आता लवकरच हे दोघेही लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते. भाग्यश्री मोटेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी ती संपर्कात असते. या माध्यमातून ती अनेकदा त्यांना माहिती देत असते. आता ती कधी लग्न करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.