चेहऱ्यावर जखमा, या मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, पुणे हादरले

चेहऱ्यावर जखमा, या मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, पुणे हादरले

अनेक कलाकारांच्या बाबतीतल्या धक्कादायक बातम्या गेल्या काही दिवसापासून उघडकीस आलेल्या आहेत. जेष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे.

सतीश कौशिक ज्या फार्म हाऊसवर थांबले होते. त्या फार्म हाऊस या मालकाच्या पत्नीने आपल्या पतीवरच आरोप करून सांगितले की, माझ्या पतीला सतीश कौशिक यांना मारायचे होते. त्यामुळे त्या प्रकरणाची गुढ देखील आता वाढले आहे, तर दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अशाच बातम्या समोर आलेल्या आहेत.

आता देखील मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आघाडीच्या असलेल्या अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या अभिनेत्रीचे नाव भाग्यश्री मोटे असे आहे. भाग्यश्री मोटे हिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. आता भाग्यश्री मोठे हिच्या बाबतीतली बातमी समोर आली आहे.

भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भाग्यश्री मोटे हिची बहीण वाकड येथे राहण्यात होती. भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचे नाव मधू मार्कंडे असे असल्याचे सांगण्यात आले. भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा केक तयार करण्याचा व्यवसाय असून या बिझनेसमध्ये तिची एक पार्टनर देखील आहे.

केक तयार करण्यासाठी त्यांना वाकड परिसरामध्ये एक खोली पाहिजे होती. त्याच्या शोधात भाग्यश्री हिची बहीण मधू मार्कंडे ही घरातूनबाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत तिची मैत्रिण देखील होती. खोली शोधत असताना अचानक मधू मार्कंडे हिला चक्कर आली आणि तिची दातखिळी बसली. यादरम्यान चक्कर आल्याने मधू ही जमिनीवर कोसळली.

भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. यामुळे हा घातपात असल्याचेच सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिस आता या प्रकरणाची चौकशी देखील करत आहेत.

Team Hou De Viral