पुरुषांसाठी वरदान आहे भाजलेली लसूण, जाणून घ्या याचे ५ मोठे फायदे

आयुर्वेदात लसणाला मोठे स्थान देण्यात आले आहे. काही जण कच्चा लसूण वापरतात तर काहीजण भाजी वा चटणीमध्ये लसणाचा वापर करतात. फार कमी जणांना लसूण भाजूनही खाल्ल्याचे फायदे माहीत आहेत. खासकरून पुरुषांना लसूण भाजून खाल्ल्याने खूप फायदे होतात. लसूणमध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. लसणावर केलेल्या रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे की, लसणामधील फायटोकेमिकल्स पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
आयुर्वेदचे डॉक्टरांकडून पुरुषांना रात्रीच्या वेळेस भाजलेली लसूण कळी खाण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या याचे फायदे
1) लसणामध्ये एलासिन नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे पुरुषांमधील मेल हार्मोन अर्थात से क्स हार्मोनचा स्तर वाढतो. तसेच लसणामध्ये सेलेनियम आणि मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स असतात ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढवतो.
2) भाजलेल्या लसणीच्या सेवनाने दातदुखीपासून आराम मिळतो. दात दुखत असेल तर, लसूण किसून दुखऱ्या दातावर ठेवा. लगेचच आराम मिळेल. लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल तत्व असते ज्यामुळे दातांचे दुखणे दूर होते.
3) भाजलेली लसूण खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कंट्रोल होण्यास मदत होते. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना भाजलेल्या लसणीचे सेवन केल्याचा सल्ला दिला जातो.
4) लसणाच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीपासून रक्षण होते. याशिवाय कॅन्सरपासूनही बचाव होतो. प्रोस्टेट तसेच ब्रेस्ट कॅन्सरपासून बचावासाठी लसूण वापरला जातो.
5) पोट खराब झाले असेल वा इन्फेक्शन झाले असेल तर भाजलेली लसूण खाल्ल्याने फायदा होतो. याच्या सेवनाने जळजळ, उलटी, पोटात गडबड होणे या समस्या दूर होतात.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.