‘भाजलेली वांगे’ या ‘७’ आजारांवर आहे रामबाण उपाय

वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संक्रमित आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. भारतातील जवळपास सर्व भागांमध्ये वांग्याची शेती केली जाते. आदिवासी भागांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वांगे वापरले जाते. वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन, डायबिटीज इत्यादी समस्या दूर होतात. येथे जाणून घ्या, वांग्याचे काही खास उपाय आणि फायदे…
खोकल्यावर गुणकारी – पाताळकोट येथील आदिवासी वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकतात. यांच्या माहितीनुसार अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो.
भूकेला शांत करते – वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स आढळून येतात, जे वजन कमी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज कमी होऊ शकतात. फायबर्सचे पोटातील प्रमाण वाढल्यामुळे भूक
वजन कमी करण्यासाठी मदत – जेवणापूर्वी अर्ध्याकच्च्या वांग्यासोबत सलाड आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास हळू-हळू वजन कमी होण्यास मदत होते.
उच्च रक्तदाबाची समस्या ठीक होते – आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार ठीक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आधुनिक विज्ञानानुसार शरीरातील आयर्नचे जास्त प्रमाण नुकसानदायक ठरू शकते. वांग्यातील नासुनीन नावाचे रसायन शरीरातलं अतिरिक्त आयर्न नियंत्रित करते. या कारणामुळे हृदय संचालन सामान्य राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो
शांत झोप लागते – भाजलेल्या वांग्यावर चवीनुसार मध टाकून रात्री खाल्ल्यास शांत झोप लागते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होते. रक्ताची कमतरता दूर होते.
अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते – वांग्याचे सूप तयार करून त्यामध्ये हिंग आणि चवीनुसार लसुन टाकून सेवन केल्यास पोट फुगणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, अपचन इ. समस्या दूर होण्यास मदत होते.
डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर – वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते आणि यामधी कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे विरघळत नाहीत. यामुळे टाइप 2 डायबिटीज ग्रस्त रुग्णांनी नियमित वांग्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.