‘चला हवा येऊ द्या’ मधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेल्याचे पहयाला मिळत आहेत. गुरुवारीच प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचेही निधन झाले. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आता चला हवा येऊ द्यामधील एका प्रसिद्ध कलाराच्या आईचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. चला हवा येऊ द्या या शोध्ये आपल्या नर्मविनाेदी वैदर्भीय बोली भाषेने सर्वांना आपलेसे करणारे विनाेदवीर भरत गणेशपूरे यांच्या आईचेही निधन झाले आहे.
आपल्या आईच्या निधनाची बातमी कळताच भरत गणेशपूरे हातातील काम सोडून गावी निघाले आहेत. सर्वांना हसवणारा कलाकार आज रडत होता, आपल्या आईच्या आठवणीमध्ये.त्यामुळे अनेकांना गहिवरून आले होते.
प्रसिद्ध विनोद वीर भारत गणेशपुरे यांच्या आई मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मलवली. विशेष म्हणजे त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्यावर रहाटगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
भरत गणेशपुरे यांचे बंधू मनीष यांच्या घरीच मनोरमाबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या आईच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर भारत गणेशपुरे हे तातडीने मुंबईहून तातडीने गावाकडे निघालेले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मनोरमाबाई यांनी नेञदानाचा संकल्प केल्याने कुणाला तरी हे जग पुन्हा पाहता येणार आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.