भात खाल्ल्याने खरंच वजन वाढते का?.. जाणून घ्या यामागचे शास्त्रीय कारणे

भात खाल्ल्याने खरंच वजन वाढते का?.. जाणून घ्या यामागचे शास्त्रीय कारणे

भारतीय संस्कृती ही सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येते. पाच हजार वर्षापासून भारतामध्ये वेगवेगळ्या जाती जमाती राहतात. सर्वांचे आहार-विहार पद्धती वेगळ्या आहेत. मात्र, यामध्ये सर्वसमावेशक घटक तांदूळ असल्याचे पाहायला मिळते.

अनेकजण आपल्या आहारामध्ये भात हे आवर्जून खात असतात. भातामध्ये वेगवेगळे गुणधर्म भरलेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये जेवणाच्या पद्धती या अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, कोशिंबीर चटणी वरण-भात-भाजी-पोळी असा चौरस आहार केल्याने आपले आरोग्य अतिशय चांगले राहते. तरीदेखील भारतातील अनेक भागांमध्ये केवळ भारतावरच लोक आपली भूक भागवतात.

उदा. दक्षिण मध्ये गेले तर तिकडचे लोक हे भात आणि वरण म्हणजेच सांबार अधिक खात असल्याचे आपल्याकडे जाणवते. तरी देखील त्या लोकांचे वजन नियंत्रणात राहून आरोग्य चांगले राहते. मात्र, आपल्याकडे अनेक भागांमध्ये भात खाल्ल्याने वजन वाढते का ? याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत, तर आम्ही आपल्याला या लेखांमध्ये असेच समज गैरसमज सांगणार आहोत.

1) भात हे पीक पाण्यावर उगवणारे आहे. त्यामुळे ते पचायला अतिशय हलके असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाताचा समावेश करायलाच हवा. भात पचायला देखील अतिशय योग्य असून यामध्ये कॅलरीचे प्रमाण असते.

2) भात खाल्ल्याने चरबी वाढते, असा अनेक लोकांचा गैरसमज आहे. मात्र, असे काही नसून भात खाल्ल्याने चरबी ही अजिबात वाढत नाही. तसेच कॅलरीचे प्रमाण देखील नियंत्रण असते. त्यामुळे अनेक आहार तज्ञ हे नियमित आहारामध्ये भाताचा समावेश करावा, असे सांगत असतात.

3) अर्ध्या कप भारतामध्ये 120 कॅलरी असतात. तर एक चपाती किंवा स्लाइडमध्ये 80 ते 90 कॅलरी असतात. त्यामुळे अर्धा कप भात खाऊन आपल्या कॅलरी वाढू शकतात. त्यामुळे रोजच्या आहारात भाताचा समावेश करावा.

4) जर आपण नुसता भात आणि वरण खात असाल तर यामध्ये अधिक तोटे नसतात. मात्र आपण तेल किंवा तुपात सोबत भात खात असल्यास यामध्ये कॅलरीचे प्रमाण हे वाढू शकते. त्यामुळे असे न करता साधा भात खाल्ला पाहिजे. जर तुपासोबत आपल्याला भात खायचा असेल तर अतिशय कमी प्रमाणात तूप घ्यावे.

5) भातासोबत अजून आपण डाळ मिक्स करून देखील खाऊ शकतो. त्यामुळे तुमचे कॅलरीचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. तसेच डाळ खिचडी आपण देखील खाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला योग्य प्रमाणात प्रथिने आणि ऊर्जा मिळून कॅलरी देखील मिळते.

6) जर आपल्याला नुसता भात खायचा कंटाळा आला असेल तर वेगवेगळ्या भाज्यांचे मिश्रण करून आपण पद्धतीने भात देखील खाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळू शकते. तसेच भाज्यांमधून आपल्याला योग्य ऊर्जा मिळू शकते.

7) अनेक आहार तज्ञ सांगतात की, भात खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. मात्र, एक वाटी पेक्षा अधिक भात रोजच्या आहारामध्ये समावेश करू नये, यापेक्षा जास्त भात खाल्यास आपल वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral