महिलांसाठी गरोदरपणात ते मधुमेह, कॅन्सरच्या आजारावरही भेंडी आहे खूप फायदेशीर, तसेच भेंडी खाण्याचे आहेत इतर फायदे

महिलांसाठी गरोदरपणात ते मधुमेह, कॅन्सरच्या आजारावरही भेंडी आहे खूप फायदेशीर, तसेच भेंडी खाण्याचे आहेत इतर फायदे

भारतीय आहार पद्धतीमध्ये भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. टोमॅटो, गोभी, पत्तागोबी, फूलगोभी, दोडका, कद्दू, बटाटे त्याचप्रमाणे वांगी देखील असतात. मात्र, यामध्ये सर्वाधिक भाजी ही आवडणारी असते ती भेंडीची. भेंडीची भाजी ही अबालवृद्धांना आवडत असते. भेंडीची भाजी लहान मुलांना आवर्जून आवडत असते.

भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पोषकतत्व मिळत असतात. भेंडीची भाजीमुळे आपली हिमोग्लोबिन वाढत असते. तसेच रक्ताची पातळी देखील वाढत असते. यासोबतच आपण कॅन्सरच्या आजारावर देखील मात करू शकता. तसेच आपला मधुमेह देखील नियंत्रणात ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया भेंडी खाण्याचे विविध फायदे..

1) हृदय : आपण नियमितपणे भेंडीचे सेवन केल्याने आपले हृदय हे अतिशय तंदुरुस्त राहते. भेंडीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे तत्व असतात. त्यामुळे भेंडीचे सेवन नियमितपणे केली पाहिजे. तसेच भेंडीमध्ये एंटीऑक्सीडेंट तत्त्व देखील मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपले हृदय तंदुरुस्त राहते.

2) गरोदरपणात : महिलांना गरोदरपणामध्ये पालेभाज्या सह भेंडीची भाजी खाण्यास अवश्य द्यावी. भेंडीची भाजी दिल्याने यामधील पोषकतत्वेमुळे होणारे बाळ हे तंदुरुस्त होते. भेंडीच्या भाजीमध्ये विटामिन बी९, फॉलिक ऍसिड मोठ्या प्रमाणात असते. तसेच अनेक न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम देखील भेंडी ने कमी होत असतात. त्यामुळे भेंडीच्या भाजीची सेवन करावे.

3) प्रतिकारशक्ती : अनेकांची प्रतिकारशक्तीही कमकुवत असते. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती टिकवणे हे अतिशय गरजेचे बनले आहे. यामुळे आपण भेंडीची सेवन करून आपली प्रतिकार शक्ती वाढवू शकतात. भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी भरलेली असते. ही आपली प्रतिकार शक्ती वाढवत असते. आठवड्यातून दोनदा तरी भेंडीची भाजी खावी.

4) वजन कमी : ज्या लोकांना वजन वाढीची समस्या आहे, अशा लोकांनी आठवड्यातून दोन तीन दिवस भेंडीची भाजी नियमितपणे सेवन करावे. असे सेवन केल्याने आपले वजन कमी होऊ शकते. भेंडीच्या भाजीमध्ये वजन कमी करण्याचे घटक असतात.

5) कॅन्सर : अनेक लोकांना कॅन्सरच्या आजाराने ग्रासलेले असते. अशा लोकांनी वेगवेगळे उपाय करून देखील त्यावर मात करता येत नाही. अशा लोकांनी कॅन्सरवर मात करण्यासाठी नियमितपणे भेंडीचे सेवन करावे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर घटक असतात. तसेच अँटिऑक्सिडंट तत्वे देखील असतात. त्यामुळे आपल्याला काही प्रमाणात नक्कीच फरक पडू शकतो.

6) मधुमेह : भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात शुगर कंट्रोल करण्याचे घटक असतात. त्यामुळे भेंडीचे सेवन करून आपण आपली शुगर ही नियंत्रणात आणू शकता. त्यामुळे नियमितपणे भेंडीच्या भाजी चे सेवन करावे. यामुळे आपली साखरही नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत मिळते.

7) मेंदू : अनेकांना स्मरणशक्ती आजार जडत असते. अशा लोकांनी नियमित भेंडीच्या भाजीची सेवन करावे. यामुळे आपला मेंदू हा तल्लख आपली बुद्धी तजेल बनते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral