या लोकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त भेंडी खाल्ल्यास होऊ शकते मोठी समस्या..

या लोकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त भेंडी खाल्ल्यास होऊ शकते मोठी समस्या..

भेंडी ही अशी भाजी आहे की जी सर्वांनाच आवडत असते. विशेष करून लहान मुलांमध्ये भेंडीची भाजी ही चवीने खाल्या जाते. लहान मुलांना भेंडीची भाजी नसली तर ते जेवतच नाहीत. भेंडीच्या भाजीमध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात. तसेच भेंडीच्या भाजीमध्ये विटामिन ए,बी,सी देखील असते. याशिवाय भेंडीच्या भाजीत आपल्याला पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे देखील भेटते. त्यामुळे भेंडीची भाजी खाणे हे सर्वार्थाने चांगली आहे.

भेंडीच्या भाजीमुळे तुमचे हेमोगलोबिन देखील मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, अशी आवडणारी भाजी काही लोकांनी खाल्ल्यास त्याचा त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. म्हणजे ज्या लोकांमध्ये काही लक्षणे असल्यास त्यांना हा त्रास होऊ शकतो. आम्ही आपल्याला या लेखामध्ये कुठल्या व्यक्तींनीही भाजी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो, याबाबत माहिती सांगणार आहोत.

1) सर्दी : ज्या लोकांना सर्दी झालेली आहे, अशा लोकांनी भेंडीची भाजी खाल्ली असताना त्यांना त्रास होऊ शकतो. त्यांची सर्दी अधिक वाढू शकते. कारण भेंडीची प्रवृत्तीही थंड असते. त्यामुळे अशा लोकांनी थंडीमध्ये भेंडीच्या भाजीचे सेवन कमी करावे.

2) खोकला : ज्या लोकांना खोकल्याचा त्रास आहे, अशा लोकांनी भेंडीची भाजी थंडीच्या दिवसांमध्ये कमी प्रमाणात खावी. नाहीतर त्यांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. तसेच खोकला असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन या भाजीचे सेवन करावे.

3) किडनी स्टोन : जा लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे, अशा लोकांनी भेंडीच्या भाजी चे सेवन अधिक प्रमाणात करू नये. नाहीतर त्यांना हा त्रास पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या भाजीचे सेवन करावे.

4) पोटाच्या समस्या : ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत, अशा लोकांनी भेंडीच्या भाजीची सेवन करू नाही. कारण भेंडीची भाजी पचायला जड असते. त्यामुळे अनेकांना याचा त्रास होऊ शकतो. ज्या लोकांची पचनक्रिया मंद आहे, अशा लोकांनी भेंडीच्या भाजीचे सेवन कमीच करावे.

5) वात : ज्या लोकांची वात प्रकृती आहे, अशा लोकांनी भेंडीच्या भाजीचे सेवन हे कमी प्रमाणात करावे. नाहीतर त्यांना वात वाढण्याची समस्याही पुन्हा होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच यावर उपाययोजना कराव्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral