हृदयासह पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरतात भिजवलेले शेंगदाणे, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

हृदयासह पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरतात भिजवलेले शेंगदाणे, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे घरच्याघरी अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. खूप ठिकाणी लहान दवाखाने बंद आहेत. त्यामुळे लहान सहान कारणांसाठी लोक रुग्णालयात जाणं टाळतात. घरी बसून फारशी हालचाल होत नाही. तसंच गरमीच्या वातावरणात फारशी भूक नसल्यामुळे आहार व्यवस्थित घेतला जात नाही. परिणामी गॅस, एसिडिटी, पोट साफ न होणे, लठ्ठपणा यासारख्या अनेक समस्या उद्भवत असतात.

पण घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही या समस्यांना स्वतःपासून लांब ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे सांगणार आहोत. इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत तुम्हाला शेंगदाणे सहज आणि स्वस्त मिळू शकतात. रात्री भिजवलेल्या शेंगदाण्याचं सेवन जर तुम्ही केलं तर आरोग्य चांगलं राहतं.

बॉडीबिल्डिंग

जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर सकाळी उठल्यानंतर शेंगदाण्यांचे सेवन फायदेशीर ठरेल. यात मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात. जर तुम्हाला आपली शरीरयष्टी आकर्षक बनवायची असेल तर सकाळी उठून शेंगदाण्यांचे सेवन करा. जेणेकरून तुम्ही व्यायाम करताना जास्त स्ट्रेंन्थ वापरू शकता. दूध आणि अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन शेंगदाण्यामध्ये असतात. हे पाण्यात भिजवून खाणे जास्त फायदेशीर असते. शेंगदाणे पाण्यात भिजवल्याने यामधील न्यूट्रिएंट्स शरीरात पूर्णपणे अब्जॉर्ब होतात.

हृदयाचे विकार

शेंगदाण्यांमध्ये अनेक प्रभावी गुण असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. एका रिसर्चनुसार शेंगदाण्यांमध्ये कार्डियोप्रोटेक्टिव गुण असतात. कार्डियोप्रोटेक्टिव गुणांमुळे हृदयाच्या रोगांपासून लांब राहता येतं.

मेंदूचे कार्य

ज्याप्रमाणे ड्राय फ्रुट्सचे सेवन करणं शरीरासाठी लाभदायक ठरतं. त्याप्रमाणेच शेंगदाणे सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. या फॅटी एसिड्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून सकाळी लवकर उठून अभ्यास करत असलेल्या मुलांना शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

त्वचा चांगली राहते

प्रत्येकालाच आपली त्वचा दीर्घकाळ चांगली आणि चमकदार दिसावी असं वाटत असतं. त्यासाठी वेगवेगळ्या ब्यूटी प्रोडक्टसचा वापर केला जातो. पण केमिकल्सयुक्त क्रिममुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते शेंगदाण्यात एंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे जर तुम्ही रोज सकाळी भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केले तर त्वचा चांगली राहील.

Team Hou De Viral