भूतनाथ मधला बंकू आठवतोय का ? पहा आता किती स्टायलिश आणि हँडसम दिसतोय. जाणून घ्या त्याच्याबद्दल

भूतनाथ मधला बंकू आठवतोय का ? पहा आता किती स्टायलिश आणि हँडसम दिसतोय. जाणून घ्या त्याच्याबद्दल

बॉलिवूडमध्ये बरेच बाल कलाकार आले ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केलीम आणि कधीकधी तर या बालकलाकारांना मुख्य कलाकारांपेक्षा अधिक दाद मिळाली. अमन सद्दीकी देखील अशा काही बाल कलाकारांपैकी एक आहे ज्यांने आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांचे खुओ मनोरंजन केले होते.

2008 मध्ये आलेला चित्रपट भूतनाथ या चित्रपटात अमन सद्दीकीने बंकू नावाच्या गोड निरागस बालकाची भूमिका साकारली होती तर या चित्रपटात भूताची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. त्याने बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केला.

प्रेक्षकांना त्याच अभिनय खूपच आवडला होता. त्यावेळी हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटात अमिताभने एका भुताची भूमिका साकारली होती, आणि बंकूला घाबरवून त्याला घराबाहेर पळवून लावण्याची इच्छा भुताची होती पण बंकू त्याच्या खोडकरपणा मुळे आणि निर्भिडपणाने त्या भूताशी मैत्री करतो आणि त्या भुताला मुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावतो.

भूतनाथ हा चित्रपट अमन सिद्दीकीचा पहिला आणि शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटानंतर अमनला आणखी बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या, परंतु त्यांने आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी बॉलिवूडला बाय म्हटले. या चित्रपटा नंतर अमनने काही टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले, पण अमनने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अशी त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती.

अमन हा जितका प्रतिभाशाली आहे, तितकाच तो अभ्यासात देखील हुशार आहे. दहावीच्या परीक्षेत तो चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. जेव्हा त्याला टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये परत यायचे आहे असे विचारले तेव्हा तो म्हणाला की मला टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपटांसाठी सतत ऑफर येत असतात पण मी सध्या माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे.

भविष्यात मला काही चांगल्या ऑफर मिळाल्यास तर मी त्याला होकार देईल. तो म्हणाला की, अमिताभ बच्चन यांच्यासमवेत एखादा चित्रपट करणे हे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. अमिताभ बच्चन सोबत चित्रपटाच्या सेटवरही त्याने बरीच मजा केली होती. या सिनेमात शाहरुख खान आणि जूही चावला सारखे मोठे स्टारही होते, पण सर्वच लाईम लाइट अमनच्या खात्यावर गेली, ती गोष्ट खरोखरच भारी होती.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral