धक्कादायक ! ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील ‘या’ महत्त्वाच्या अभिनेत्रीने सोडली मालिका

धक्कादायक ! ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील ‘या’ महत्त्वाच्या अभिनेत्रीने सोडली मालिका

फुलाला सुगंध मातीचा ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अनेक भूमिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. मात्र आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने ही मालिका सोडली असल्याची चर्चा सध्या काही दिवसांपासून रंगत आहे.

याबद्दल आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत. फुलाला सुगंध मातीचा ही मालिका काही महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात. मालिकेमध्ये सध्या किर्तीची आयपीएसची खडतर ट्रेनिंग सुरू झालेली आहे.

फुलला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये समृद्धी केळकर हिने देखील अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. सध्या समृद्धीचे ओम शिंदे यांच्या सोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, तर या मालिकेमध्ये मधुरा जोशी हिने देखील अप्रतिम असे काम केले असून तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

तिने गुरु दिवेकर सोबत लग्न केले आहे. तर या मालिकेमध्ये प्रशांत चोडप्पा हे देखील चांगले काम करताना दिसताहेत. ऐश्वर्या शेटे हिने देखील मालिकेमध्ये चांगली भूमिका साकारली आहे. तर हर्षद अतकरी याने या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. गौतमी देशपांडे सोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे सांगण्यात येते, तर तुषार साळी यांनी देखील या मालिकेत चांगले काम केले आहे.

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये किर्तीची भूमिका साकारणारी अभिने़ञी समृद्धी केळकर जबरदस्त आहे. तिचा जन्म 1995 मध्ये झालेल्या ठाण्यात झाला. शिकत असताना तिला काही वर्षापूर्वी अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तिने या मालिकेत थेट प्रवेश मिळवला. आता या मालिकेमध्ये नवीन वळण येताना प्रेक्षकांना दिसत आहे.

आता देखील या मालिकेतील एका अभिनेत्रीने ही मालिका सोडली असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे‌. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे याबद्दलही अनेकांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेमध्ये जान्हवीची भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली आहे.

जान्हवीची भूमिका या मालिकेत भूमीजा पाटील हिने केली आहे. भूमीजाच्या पाटील हिने‌ ही मालिका सोडली असे सांगण्यात येत आहे. याचे कारणही समोर आले आहे. भूमिजा पाटील आता लवकरच सन मराठीवर सुरू होणाऱ्या माझी माणसं या मालिकेत दिसणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

या मालिकेचा प्रोमो देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या मालिकेमध्ये रात्रीस खेळ चाले या मालिकेत काम केलेला साईंकीत कामत तर अभिनेत्री जानकी पाठक हीदेखील प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. ही मालिका मिळाल्याने भूमीजा पाटील हिने फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सोडली असल्याची चर्चा रंगली आहे.

मात्र, दुसरीकडे असेही सांगण्यात येत आहे की, भूमिजा आता दोन्ही मालिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आपल्याला भूमिजा साकारत असलेली भूमिका आवडते का, आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral